Viral Video: तुम्ही कितीही श्रीमंत, गरीब, सुंदर किंवा कुरूप असला तरीही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग तुमच्या चांगल्या, वाईट कर्मांवर अवलंबून आहे. आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळही आपल्याला मिळते. शिवाय आपण केलेल्या वाईट कर्माचे फळही आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतेच. असं म्हणतात, आताच्या कलियुगामध्ये तर आपण करत असलेल्या वाईट कर्माचे फळ देव लगेच आपल्याला देतो. सध्या अशीच एक घटना दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो, ज्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते तर काही व्हिडीओंमधून आपल्याला चांगली शिकवण मिळते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरीही विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
a young guy fell on terrace while dancing
डान्स करता करता तरुण थेट जिन्यावरून खाली पडला, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
Husband wife dance video
VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
Auto Rickshaw Driver Wins Hearts by Offering Free Rides to Pregnant Women
रिक्षाचालकाने जिंकले मन; गर्भवती महिलांसाठी केले असे काही…; व्हिडीओ एकदा पाहाच
Groom dance in his own haladi function with his cousins funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं स्वत:च्याच हळदीला केला तुफान डान्स; VIDEO झाला व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कार्यक्रमातील स्टेजवर एक महिला डान्स करत असून यावेळी स्टेजवर एक श्वान पोहोचतो. स्टेजवर श्वान आलेला पाहून एक व्यक्ती स्टेजवर जाऊन त्याला फरपटत स्टेजच्या मागे फेकण्याचा प्रयत्न करते. पण, यावेळी श्वानाला फेकता फेकता ती व्यक्तीदेखील खाली पडते. व्यक्ती खाली पडलेली पाहून कार्यक्रमातील लोक मोठमोठ्याने आराडा ओरड सुरू करतात. मुक्या प्राण्याला देत असलेल्या त्रासामुळे त्या व्यक्तीलादेखील दुखापत झाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sumit_khatik_02 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: ‘बघता-बघता चिमुकली पाण्यात पडली…’ भावाच्या रडायच्या आवाजाने बाबा धावत आले अन्… अंगावर काटा आणणारा VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “कर्माचे फळ नक्कीच मिळते.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बरं झालं, याला असंच पाहिजे”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “करावे तसे भरावे.”

Story img Loader