scorecardresearch

मित्र असावा तर असा! कुत्र्याने चिमुकल्यावर हल्ला करताच ‘त्याने’ घेतली धाव; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

संकटात अडकलेल्या चिमुकल्याच्या मदतीला धावलेल्या कुत्र्याने जिंकली नेटकऱ्यांची मनं, पाहा Viral Video

मित्र असावा तर असा! कुत्र्याने चिमुकल्यावर हल्ला करताच ‘त्याने’ घेतली धाव; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. संकटात सापडलेल्या आपल्या मालकासाठी किंवा कुटुंबातील व्यक्तीसाठी कुत्रा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतो. अशी बरीच उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याने चिमुकल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना त्याचा मित्राने म्हणजेच त्याच्या पाळीव कुत्र्याने त्याला हल्ल्यापासून वाचवले.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आणि पाळीव कुत्रा घरासमोर खेळत असल्याचे दिसत आहे. त्यांचा हा खेळ सुरू असतानाच अचानक बाजूच्या घरातून एक कुत्रा वेगाने धावत या मुलाच्या दिशेने येत असल्याचे दिसते. मुलासोबत खेळत असलेल्या कुत्र्याच्या हे लक्षात येताच तो वेगाने धावत मुलाच्या अंगावर धावत त्याला खाली झोपवण्याचा प्रयत्न करतो. इतकेच नाही तर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुत्र्याला हा पाळीव कुत्रा भुंकत, त्याच्यावर हल्ला करत तिथून पळवून लावतो. पाहा व्हायरल व्हिडीओ.

आणखी वाचा: बाजूला घरं येताच ट्रेनचे पडदे आपोआप होतात बंद; Viral Video पाहून तुम्हीही चकित व्हाल

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: सिंहाला चिडवण्याचा प्रयत्न करताच तो चिडला अन्…; Viral Video वर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया का दिली पाहा

या व्हायरल व्हिडीओतून फक्त घरातील मंडळीच पाळीव प्राण्यांवर प्रेम करतात असे नसून, ते पाळीव प्राणी देखील घरातल्या सदस्यांना तितकाच जीव लावतात, त्यांची काळजी घेतात हे स्पष्ट होते. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 13:12 IST

संबंधित बातम्या