सोशल मीडियावर रोज नवा व्हिडिओ व्हायरल होत असतो. आता रनवेवर टायर पंक्चर झालेल्या विमानाचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. रस्त्यात गाडीचा टायर पंक्चर झाला तर धक्का मारून गाडी बाजूला करावी लागते. मात्र ही काही नविन बाब नाही. असं चित्र आपण कधीतरी पाहिलंच असेल. मात्र बुधवारी कोलतीच्या बाजुरा विमानतळावर ही घटना घडली. रनवेवर एका विमानाचा टायर पंक्चर झाला आणि मग काय लोकांनी एकत्र धक्का विमान बाजूला केलं.

कोलती विमानतळाच्या वर एक पॅसेंजर विमान घिराट्या घालत होते. ते विमान जिल्ह्यातील उत्तरपूर्व भागातील प्रवाशा्ंना नेण्यासाठी आलं होतं. प्रवासी विमानतळावर आलेही होते. मात्र विमान लँड करता येत नव्हतं. कारण रनवेवर एक विमान उभं होतं. त्यामुळे विमान लँड करण्यास अडचणी येत होत्या. अखेर एका प्रवाशाच्या ही बाब लक्षात आली आणि त्याने इतरांना सांगितलं. प्रवाशांनी एकत्र येत तारा एअर 9N AVE विमान बाजूला केलं. त्यानंतर दुसरं विमान रनवेवर उतरलं. सोशल मीडियावर विमानाला धक्का मारून बाजूला करतानाचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

कोल्टीहून धनगडीकडे जाणाऱ्या खगेंद्र खडका या प्रवाशाने सांगितले की, धावपट्टीवर विमानाचा टायर फुटला. 9N AVE हुमला येथील सिमकोट येथून बाजुरा विमानतळावर उतरले होते. धावपट्टीवरून टॅक्सीवेवर आल्यानंतर त्याचा मागचा टायर फुटला आणि विमान मधल्या धावपट्टीवर उभं राहिलं. तारा एअर नेपाळच्या यति एअरलाइन्सची उपकंपनी आहे.