प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात, याबाबतीत सर्वांचेच एकमत होईल. अगदी लहान असल्यापासून ते मुलं मोठी झाली तरी पालकांची चिंता करण्याची सवय कमी होत नाही. आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागू नये अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मुलांच्या सुरक्षेसाठी ते काहीही करायला तयार होऊ शकतात. प्राण्यांच्या बाबतीतही हे असेच आहे. याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक बिबट्या पोर्क्युपिन्सच्या पिल्लांवर हल्ला करण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. ही गोष्ट त्या पिल्लांच्या पालकांना म्हणजेच तिथे उपस्थित असणाऱ्या पोर्क्युपिन्सना समजताच ते पिल्लांना त्यांच्या मागे लपवण्याचा प्रयत्न करतात. बिबट्या दुसऱ्या बाजुने त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच पोर्क्युपिन्स पिल्लांना चारही बाजुने संरक्षण देण्याचा प्रयत्न करत, बिबट्याला तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

आणखी वाचा: मित्र असावा तर असा! कुत्र्याने चिमुकल्यावर हल्ला करताच ‘त्याने’ घेतली धाव; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: ट्रेकिंग करताना उंचावरून तोल गेला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल होणारा हा व्हिडीओ भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. पोर्क्युपिन्सनी बिबट्यापासून वाचवण्यासाठी पिल्लांना झेड क्लास सिक्युरिटी दिली असल्याचे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. त्यांनी कमेंट्समध्ये या झुंजीबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.