Pune Professor Sing Mehbooba Mehbooba Song Viral Video : आपण कितीही मॉडर्न काळात वावरत असलो तरीही ९० च्या दशकातील बरीच गाणी सध्या ट्रेंड म्हणून इन्स्टाग्रामवर रीलमार्फत व्हायरल होताना दिसतात. जुने चित्रपट म्हणा किंवा त्यांच्यातील गाणी आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. तर, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्येहीअसंच काहीसं पाहायला मिळालं. ९० च्या दशकातील प्रसिद्ध गाणं पुण्यातील एक प्राध्यापक म्हणताना दिसत आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून अक्षरशः सगळ्यांना वेड लागलं आहे.

व्हायरल व्हिडीओ पुण्यातील असून श्री बालाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘दृष्टी २०२६’ (Drishti 2026) या कार्यक्रमाचा आहे. @nupurmaheshwari7 या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, महाविद्यालयाचे प्राध्यापक स्टेजवर (मंचावर) मध्यभागी येऊन, भरपूर गाजलेला बॉलीवूड चित्रपट ‘शोले’ मधील एका प्रसिद्ध गाण्यावर सादरीकरण करताना दिसत आहे आणि या गाण्याचे बोल ‘मेहबूबा मेहबूबा’ असे आहेत. प्राध्यापकांची ऊर्जा पाहून सगळेच शॉक झाले आहेत.

तुम्ही व्हायरल व्हिडीओत पहिले असेल की, गाणं गात असताना प्राध्यापक पूर्णपणे त्या गाण्यांच्या सुरत, तालात रमलेले दिसत आहेत . त्यांनी खूप उत्साहाने आणि छान स्टेज प्रेझेन्ससह परफॉर्मन्स दिला, ज्यामुळे वातावरण एकदम रंगून गेले. विद्यार्थीदेखील जोरात ओरडत, टाळ्या वाजवत आणि व्हिडीओ शूट करताना दिसले आणि संपूर्ण वातावरण एकदम कॉन्सर्टसारखं आनंदी आणि उत्साही बनलं. पुण्याच्या प्रोफेसरने गायलेलं गाणं एकदा तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून नक्की ऐका…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nupurmaheshwari7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भारावले आहेत आणि “अशा हिर्‍यासारख्या प्राध्यापकांकडून शिकायला मिळणं खरंच भाग्याची गोष्ट आहे. वर्गात Operations शिकवण्यापासून ते स्टेजवर गाणं गाऊन धमाल उडवण्यापर्यंत… खरंच कमाल”, तर एका युजरने त्यांची ओळख पटवून देत “प्रोफेसर बालाजी रेड्डीन (Professor Balaji Reddie) भारतातील ऑपरेशन्स मॅनेजमेंट क्षेत्रातील एक मोठं नाव. पण अनेकांना हे माहितही नाही की ते Lambada Band चे संस्थापक सदस्यही आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती तुम्ही सहज शोधू शकता, पण एवढं नक्की – अशा व्यक्तीला सलाम केलाच पाहिजे” ; अशी कमेंट केली आहे.