बँकांमध्ये चोरी झाल्याच्या घटनांबद्दल आपण अनेकदा बातम्या पाहतो, वाचतो. बँकेत चोरी करून चोरांनी मोठी रक्कम पळवल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. धारदार शस्त्र बाळगणाऱ्या चोरांसमोर तिथले कर्मचारीही हतबल होतात. अनेकदा बँक कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवल्यास त्यांच्यावर हल्ला केला जातो, यात अनेकवेळा कर्मचारी जखमी होतात. शस्त्राची भीती दाखवून अनेकदा अशी चोरी केली जाते. असाच एक बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ राजस्थानमधील आहे. तेथील श्री गंगानगरमधील मरूधरा ग्रामीण बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये एक चोर बँक कर्मचाऱ्यांना त्याच्या बॅगेत पैसे भरण्यासाठी धमाकावत असल्याचे दिसत आहे. काही कर्मचारी त्याच्या हातातील शस्त्र खेचण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना यश मिळत नाही. तेव्हा बँकेच्या मॅनेजर पूनम गुप्ता तिथे असणाऱ्या पक्कडने चोराला मारायला सुरूवात करतात, चोरही त्यांना प्रतिकार करतो. पूनम गुप्ता यांनी न घाबरता चोराला मारत राहिल्याने आणि इतरांची त्यांना साथ मिळाल्यामुळे चोर लगेच तिथून पळ काढतो. या घटनेचा व्हिडीओ भारतीय महसूल विभागात सेवेत असणारे अधिकारी डॉ. भगीरथ चौधरी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Pune Police Big Decision On Transgender
पुणे: ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई
Delhi High Court directs Sports Ministry to clarify stand on suspension of Wrestling Federation of India
भारतीय कुस्ती महासंघाच्या निलंबनासंदर्भात भूमिका स्पष्ट करा! दिल्ली उच्च न्यायालयाची क्रीडा मंत्रालयाला सूचना

आणखी वाचा : आजीच्या मृत्यूबद्दलच्या Linkedin पोस्टमुळे बड्या कंपनीचा CEO ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

डॉ. भगीरथ चौधरी यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

डॉ. भगीरथ चौधरी यांनी पूनम गुप्ता यांच्या धाडसी वृत्तीचे कौतुक केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी देखील पूनम गुप्ता यांच्या सतर्कतेचे आणि धाडसाचे कौतुक केले आहे.