Ramayana Viral Video: तुम्ही जर नव्वदीच्या दशकात भारतात मोठे झाले असाल, तर तुम्हाला रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स चे ऍनिमेटेड कार्टून नक्कीच माहीत असेल. भारत-जपानी राजनैतिक संबंधांच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त बनवलेला हा चित्रपट कधीही भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही परंतु कार्टून नेटवर्कवर नियमितपणे प्रसारित केला गेला. जपानी चित्रपट दिग्दर्शक युगो साको होते यांनी हे रामायण साकारले होते याबाबत फार लोकांना माहिती नाही, इतकंच नव्हे तर या कार्टून मधील प्रभू श्रीरामांचा आवाज ब्रेकिंग बॅड सीरीजमधील अभिनेत्याने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युनायटेड स्टेट्समध्ये हा चित्रपट वॉरियर प्रिन्स किंवा द प्रिन्स ऑफ लाईट: द लीजेंड ऑफ रामायण म्हणून प्रदर्शित झाला होता. अमेरिकन प्रेक्षकांना कथा सहज समजावी म्हणून ही आवृत्ती साकारण्यात आली होती. याच आवृत्तीत ब्रायन क्रॅन्स्टनने भगवान राम आणि टॉम वायनरला रावणाच्या भूमिकेत आवाज दिला होता. या ट्रेलरमध्ये ब्रायन क्रॅन्स्टन यांना भगवान रामाचा आवाज देताना ऐकू शकता.

Video: जपानी गायिकेने पुण्यात येऊन गायलं सलील कुलकर्णींचं गाणं; उच्चार इतके स्पष्ट की पुणेकरही भाळले, बघाच

जपानी रामायणाची कल्पना कशी सुचली?

१९८३ मध्ये द रामायण अवशेष या माहितीपटावर काम करताना युगो साको यांना या चित्रपटाची कल्पना सुचली. रामायण अवशेष उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळ डॉ. बी.बी. लाल यांनी केलेल्या उत्खननाविषयीचा एक माहितीपट आहे. यादरम्यान रामायण हे महाकाव्य त्यांना इतके भावले की त्यांनी जपानी भाषेत त्याच्या 10 आवृत्त्या वाचल्या.

साको यांनी या चित्रपटासाठी भारतीय अॅनिमेटर राम मोहन यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, “राम हे प्रभू आहेत, मला अभिनेत्यापेक्षा अॅनिमेशनमध्ये त्याचे चित्रण करणे चांगले वाटले.”

राम व रावण इतके खरे की…

चित्रपटाचे निर्माते कृष्णा शाह यांनी या प्रयोगाविषयी सांगितले की, “कोणीही कथा सांगू शकतो कारण रामायणाचा गाभा कथानक आहे, परंतु साकोची गुरुकिल्ली ही आहे की त्यांनी पात्रांमध्ये माणुस उभा केला. खरंच, हे कार्डबोर्डचे रामायण नाही ही त्यातील पात्रे जिवंत भासतात. राम – हनुमान ते कुंभखर्ण ही पात्र इतकी खरी भासतात की काहीवेळासाठी या केवळ अॅनिमेटेड आकृत्या आहेत, हे आपण विसरून जातो.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये भगवान रामासाठी अरुण गोविल, रावण म्हणून अमरीश पुरी आणि सीतेच्या भूमिकेत नम्रता साहनी यांनी आवाज दिला होता, तर इंग्रजी डब केलेल्या आवृत्तीत निखिल कपूर, उदय माथन आणि राईल पदमसी यांनी संबंधित भूमिकांसाठी आवाज दिला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video ramayana shri ram voice was given by breaking bad star bryan cranston unknown facts svs
First published on: 23-09-2022 at 13:42 IST