Viral Video: सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टींचा ट्रेंड सतत बदलत असतो. मग ती गाणी असो किंवा एखादा डान्स व्हिडीओ, यावर सतत विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रिल्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रिल्स बनवतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ हे मराठमोळं गाणं तुफान चर्चेत आहे. या गाण्यावर लोकांनी लाखो रिल्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दरम्यान, आता सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सुसेकी’ गाणं खूप चर्चेत आहे, ज्यावरील अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत.

हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात, अनेकदा अभ्यासापेक्षा त्यांचे सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असते. एखादे नवीन गाणे आले की ते त्यांच्या नेहमीच तोंडपाठ असते. अनेकदा शाळेत शिकवलेल्या कविता त्यांच्या लक्षात राहत नाहीत, पण रिल्समधील गाणी ते नेहमी पटापट बोलतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील अशाच एका लहान गोड मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यावर ती ‘पुष्पा २’ मधील ‘सुसेकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
The puppy will cry after the owner's scream
“आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल
Sukanya Mone dance on pushpa 2 sooseki song viral on social media
“सूसेकी…”, सुकन्या मोनेंना पडली ‘पुष्पा-२’ च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल
brother sister present amazing lavani
Video : बहीण भावांनी केला एकच कल्ला! सादर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ एकदा पाहाच
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
a groom danced in his wedding and expressed love for bride
नवरदेवाचे प्रेम पाहून नवरीला आले रडू! भर मांडवात केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Video of a snake crawling on the hair of a sleeping woman went viral
झोपलेली असताना महिलेच्या केसात अडकला साप; थोडीशी हालचाल अन् खेळ खल्लास; थरारक VIDEO व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका लहान मुलीने सुसेकी गाण्यातील कपड्यांच्या स्टाइलप्रमाणे कपडे घातले असून ती या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या चिमुकलीचा हा गोड डान्स तुम्हालाही आवडेल. या व्हिडीओवर चक्क अभिनेत्री रश्मिका मंदानादेखील “खूप क्यूट”, अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक युजर्सदेखील यावर कमेंट करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “प्रेम म्हणजे प्रेम असतं” दादर स्थानकावर प्रेयसीबरोबर कॉलवर बोलण्यासाठी तरुणाची करामत; PHOTO पाहून युजर्स म्हणाले, ‘बहुतेक ब्रेकअप…’

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adorable_aanyaa या अकाउंटवर शेअर केला असून यावर आतापर्यंत जवळपास दहा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर सहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूप गोड’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘छोटी रश्मिका’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘क्यूट बेबी.’ तर इतर अनेक जण चिमुकलीचं कौतुक करताना दिसत आहेत.