Viral Video Rat Jumps Out Of Meetha Paani : डब्यात चांगली भाजी नाही, कंटाळा आला, भूक लागली, काही चटपटीत खावंसं वाटलं की, आपल्यापैकी अनेक जण पाणीपुरीकडे धाव घेतात. पाणीपुरी हा सगळ्यांसाठी अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणीपुरीचं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. तिखट पाणी, गोड पाणी, सुखा पुरी आणि बरंच काही खाल्यावर मन अगदीच तृप्त होऊन जातं. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला उलटी येईल आणि पुढच्या वेळी पाणीपुरी खाताना अगदी १०० वेळा विचार कराल.
अमृतसरमध्ये रस्त्याच्याकडेला असलेल्या एका स्टॉलवर पाणीपुरीच्या डब्यात जिवंत उंदीर आढळून आला. व्लॉगर आणि त्याचे मित्र पाणी पुरी खायला गेलेले असतात. तितक्यात विक्रेत्याला भांडयात काहीतरी दिसते. तो चमच्याने भांड्यात ढवळून उंदीर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यात भांड्यातून जिवंत उंदीर बाहेर पडतो आणि पाणीपुरी खायला आलेल्या तरुणांच्या पायाखालची जमीन सरकली.गाडी (कार्ट) बाकी स्वच्छ दिसत होती, त्यामुळे कदाचित उंदीर थोड्याच वेळ आधी त्या भांड्यात शिरला असावा असाही अंदाज लावला जातो आहे.
पाणीपुरीच्या पाण्यातून उंदराने मारली उडी (Viral Video)
विक्रेता मिश्रणातून उंदीर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तितक्यात भांड्यातून उंदीर उडी मारून पळून जातो, त्यामुळे आसपासचे लोक आश्चर्यचकित होतात. व्लॉगरच्या म्हणण्यानुसार, त्याने विक्रेत्याला लगेच ते खराब झालेले मिश्रण फेकून देण्यास सांगितले. यामुळे रस्त्यावरील अन्न सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाली आहे. अनेकांनी व्हिडीओ पाहून नाराजी, एआय असेल, रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरील स्वच्छतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @karan_dhanju26 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून टेन्शनमध्ये आले आहेत आणि “तो फक्त वरवर गोड पाण्याचे भांड साफ करत आहे. पण मिश्रण फेकत नाही. म्हणजेच तेच मिश्रण तो दिवसभर लोकांना देत राहू शकतो”, “लोक कधी कधी supplements (जसे peptides, vitamin D, whey protein) यांना धोकादायक म्हणतात. पण रस्त्यावरील अन्न मात्र खूप छान आणि हेल्दी आहे असे समजतात. जोपर्यंत त्यात उंदीर किंवा घाण दिसत नाही तोपर्यंत”, “म्हणजे जणू काही मोठी गोष्टच नाही झाली असे दाखवत विक्रेता टेबल साफ करताना दिसतो आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…
