Viral video: तुम्हीही कधीतरी फास्ट फूड ऑर्डर केलंच असेल, किंवा रस्त्यावर लागणाऱ्या गाड्यांवर मोमोज खाल्लेच असणार. मोमोज हे फास्ट फूड हल्ली तरुणाईच आवडतं फास्ट फूड झालं आहे. दरम्यान अशाच एका मोमोज विक्रेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मोमोज विक्रेत्याची महिन्याची कमाई एकून तुम्हीही थक्क व्हाल. नुसतं थक्कच होणार नाही तर म्हणाल आपण पण करायचं का हे काम सुरु? थांबा आधी व्हिडीओ पाहा आणि मग ठरवा.
मोमोज खाणं आजकाल बऱ्याच लोकांना आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीने मोमोज बाजारात मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी मोमोजची किंमतही वेगवेगळी असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, मोमोज विकून किती कमाई केली जात असेल? याचाच खुलासा इन्फ्लुएन्सरने केला आहे. यात तुम्हाला एक मोमोवाला दिसेल. जो दिवसाला तब्बल १ लाख रुपयांची कमाई करतो. विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हायरल व्हिडीओ नक्की पाहा.
संध्याकाळी ५ ते रात्री १० या पाच तासांमध्ये त्याने ९५० प्लेट मोमो विकले. म्हणजेच दिवसाला १ लाख ४ हजार रुपयांची कमाई झाली. त्यानुसार ३० दिवसांचा हिशोब केला तर महिन्याची कमाई सुमारे ३१ लाख ३५ हजार रुपये होते. आणि अर्थातच हा आकडा अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा जास्तच आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. मोमोजमधून होणाऱ्या कमाईबाबत वाचून लोक अवाक् झाले आहेत. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, “कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करण्याऐवजी मी मोमोजचा स्टॉल लावायला पाहिजे होता. आज मला दिल्लीत भाड्याच्या घरात रहावं लागलं नसतं”. दुकानदाराचा अंदाज बरोबर असेल, तर चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या सरासरी कर्मचाऱ्याच्या तुलनेत ही जास्त कमाई आहे. मोमोज विकून जास्त पैसा मिळतो, एवढाच भाग नाहीय. मोमोजची टेस्टही तितकीच महत्वाची आहे. त्याशिवाय लोकेशन सुद्धा महत्वाच आहे. कारण लोकेशन चांगलं असेल, गर्दीच ठिकाण असेल, तर फायदा जास्त असं गणित आहे.
