सध्या सर्वत्र फिफा वर्ल्ड कप २०२२ ची चर्चा सुरू आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह दिसत आहे. याचदरम्यान फूटबॉल खेळाचा एक वेगळाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फूटबॉलच्या मैदानात खेळ सुरू असताना चक्क एका गेंड्याने प्रवेश केला असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अचंबित झाले आहेत. खेळ सुरू असताना या गेंड्याने मैदानात कसा प्रवेश केला असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो पाहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ.

व्हायरल व्हिडीओ :

Which teams will qualify for playoffs
IPL 2024 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके सामने जिंकणे आवश्यक, ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

आणखी वाचा : अजबच! सरकारी अधिकाऱ्यापुढे कुत्र्यासारखा भुंकू लागला हा माणूस; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘एका खेळाडूला बदलण्याचा अथक प्रयत्न’ असे कॅप्शन दिले आहे. नेटकऱ्यांनाही गेंड्याने खेळाडूंना दिलेला हा त्रास पाहून हसू अनावर झाले, अनेकांनी तशा कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.