Viral Rickshaw Funny Dialogue News: रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेकदा ट्रॅकवर, टॅक्सीवर नाहीतर रिक्षावर भन्नाट असं काहीतरी लिहिलेलं वाचलं असेलच. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये रिक्षावाल्यानं रिक्षाच्या मागे जे काही लिहिलंय ते पाहून तुम्हीही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या याचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिक्षाच्या नंबरवरुन ही रिक्षा कोल्हापुरातली असल्याचं बोललं जातंय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीनं रिक्षातून प्रवास करताना समोर उभ्या असलेल्या रिक्षाच्या मागे लिहिला डायलॉग व्हिडीओमध्ये कॅप्चर केला आहे. जो वाचून सोशल मीडियावर या रिक्षा चालकाचे प्रचंड कौतुक केले जाते आहे. तुम्हाला आता उत्सुकता लागून राहिली असेल की नक्की काय रिक्षाचालकानं असं नेमकं लिहिलंय तरी काय? तर या रिक्षा चालकानं लोकांना एक सवाल केला आहे. रिक्षाच्या मागे कधी कधी इतक्या भन्नाट गोष्टी लिहिलेल्या असतात की आपल्यालाही वाचून आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी तेवढीच कमी असते. रिक्षा अशी काही नटवली सजवलीही जाते की आपल्याही नकळत आपली नजर त्या रिक्षेकडेच जाते. आपल्यालाही अशा रिक्षा पाहून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. सध्या अशाच एका रिक्षाची चर्चा होत आहे.
पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता ?
यामध्ये तुम्हाला रिक्षाचा मागचा भाग दिसेल ज्याच्या मागे रिक्षाच्या मागील बाजूला एक प्रश्न लिहला आहे. हा प्रश्न असा की, पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता ? मीठ की साखर ? दरम्यान या रिक्षा चालकानंच याचं भन्नाट उत्तर दिलं आहे. हे वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की. या रिक्षा मालकानं याचं उत्तर पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ हा “महानगरपालिकेचं डांबर” असं दिलं आहे. या डायलॉगवरून तुम्हालाही कळेल की या डायलॉगमध्ये किती दम आहे ते. हो, अशाच काही प्रतिक्रिया या या व्हिडीओच्या खालीही उमटायला लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच या व्हिडीओची चर्चा आहे. अनेकजण या व्हिडीओखाली सकारात्मक कमेंट्स करताना दिसत आहेत. काहींनी रिक्षावाल्याच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी बरोबर लिहिलं आहे असं म्हटलंय. या व्हिडीओला पोस्ट करणाऱ्याचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: ड्रायव्हर बापाला नोकरीच्या शेवटच्या दिवशी मुलानं दिला सुंदर निरोप; गाडीच्या मागे काय लिहलं एकदा पाहाच
सोशल मीडियावर हा व्हिडीओ rushi_editor_23 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये युझरनं लिहिलं आहे की, एकदम बरोबर तर आणखी काहींनी वाह वाह अशी कमेंट केली आहे.