Shocking Snake Video : तुम्ही आतापर्यंत साप पकडण्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही. चक्क एका देशाच्या बड्या मंत्र्याने घरात घुसलेल्या खतरनाक सापाला कोणत्याही साधनाशिवाय, थेट उघड्या हाताने पकडलं. हा व्हिडीओ पाहून साप आहे की खेळणं असा प्रश्न अनेकांना पडलाय, कारण जमिनीवर वळवळणारे साप त्यांनी ज्याप्रकारे पकडलेत ते पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल.

व्हिडीओत अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर हे चक्क सापांना पकडताना दिसतायत. व्हिडीओची सुरुवात झाली ती एका अनपेक्षित आवाजाने. डॉ. मेहमत ओझ यांच्या घराच्या छतावर अत्यंत चपळ आणि विषारी दोन ‘ब्लॅक रेसर’ साप रेंगाळताना दिसले. सापांची चपळता पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा थरकाप उडाला होता.

अशा परिस्थितीत सामान्य माणूस सर्पमित्राला फोन करतो किंवा तिथून पळ काढतो. मात्र, तिथे उपस्थित असलेले अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कोणताही विचार न करता, सुरक्षेचे कोणतेही साधनं न घेता ते थेट त्या सापाच्या दिशेने पुढे सरसावले.

सापाच्या अगदी जवळ गेल्याचे पाहून त्यांची पत्नी चेरिल हाइन्स कमालीची घाबरली. ‘प्लीज, त्याला हात लावू नका, तो चावेल!’ अशी ओरडून ती त्यांना वारंवार सांगत होती. तिच्या आवाजातली भीती स्पष्ट जाणवत होती. पण, केनेडी यांच्या डोक्यावर वेगळंच भूत स्वार होतं. पत्नीच्या ओरडण्याकडे साफ दुर्लक्ष करत त्यांनी अत्यंत शांतपणे आपला हात पुढे केला आणि पुढच्याच सेकंदाला जे घडलं, त्याने उपस्थितीत सगळ्यांनीच आपला श्वास रोखून धरला.

अतिशय चपळतेने रॉबर्ट यांनी लपण्यासाठी पळणाऱ्या दोन सापांना उघड्या हातांनी पकडलं. सापांनी वळवळत पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण केनेडी यांनी त्यांना शेवटी पकडलचं. साप त्यांच्या हाताला विळखा घालण्याचा प्रयत्न करत होता, फणा काढून फुत्कारत चावण्याचा प्रयत्न करत होते, पण यावेळी केनेडी यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांनी त्या खतरनाक सापांना एखाद्या लहान मुलाच्या प्लास्टिकच्या खेळण्यासारखं सहज हातात धरून ठेवलं होतं. सापांची शेपटी पकडून ते वर करून दाखवत होते.

सापाला पकडण्याचा हा व्हिडीओ @RobertKennedyJr यांनी स्वत: त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे, ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. हे आरोग्य