scorecardresearch

Premium

VIRAL VIDEO : चालत्या गाडीतून थेट दुसऱ्या गाडीमध्ये गेला आणि पुन्हा पहिल्या गाडीवर आला, पाहून सारेच थक्क

हे त्याने कसं केलं हा विचार करूनत लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे.

Russian-Stuntman-Viral-Video
(Photo: Youtube/ mychannel)

रशियन स्टंटमॅनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण वेगवान कारच्या छतावर असलेला दिसत आहे. या वेगवाग गाडीवरून हा तरूण आपल्या डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत हा तरूण थेट दुसऱ्याच गाडीत घुसला. हे त्याने कसं केलं हा विचार डोक्यात येण्याआधीच तो पुन्हा आपल्या पहिल्या गाडीवर पोहोचतो. हे सगळं इतक्या वेगाने घडतं की, व्हिडीओ तीन-चार वेळा पाहिल्यावरच खरा प्रकार नक्की काय आहे हे समजते.

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा सुरूवातीला काही वेळासाठी चक्रावून जाल. हा व्हिडीओ व्हायरल हॉग नावाच्या अकाउंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. या चकित करणाऱ्या व्हिडीओमध्ये एक रशीयन तरूण स्टंट करताना दिसतोय. हा स्टंट वेगवेगळ्या अॅंगलने दाखवला आहे. इव्हगेनी चेबोटारेव्ह असं या स्टंटमॅनचे नाव आहे. याआधीही त्याने असे अनोखे स्टंट दाखवले आहेत, ज्यावर तुमचा विश्वास बसणं कठीण आहे, पण प्रत्यक्षात तो त्याने केलेला पराक्रम आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
marathi women denied flat in mulund west viral video
“महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!

आणखी वाचा : जपानी यूट्यूबरने मुंबईच्या रस्त्यावर बसलेल्या आजोबांसाठी वडा पाव विकत घेतला, हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही भावूक व्हाल

हा स्टंट इतक्या वेगाने केला जातो की काय झालं हे समजणं कठीण होतं आणि म्हणूनच ही व्हिडीओ क्लिप केवळ दहा सेकंदांची होती, ज्यामध्ये तो स्लो मोशनमध्ये दाखवण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. गाडीला साधं स्पर्श न करता या तरूणाने वेगवान कारमधून दुसऱ्या गाडीत कसा काय प्रवेश केला आणि पुन्हा अचूक वेळ साधत पुन्हा पहिल्या गाडीवर कसा काय आला, असाच प्रश्न सारेच जण विचारत आहेत. हा कमालीचा व्हिडीओ प्रत्येकाला चक्रावून सोडतो आहे.

आणखी वाचा : चालत्या गाडीच्या खिडकीतून मुलगी पडली, ड्रायव्हरला कळलंच नाही; पुढे काय झालं? पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : महापुरात अडकलेल्या हत्तीला वाचवले, सात तासांच्या बचाव मोहिमेचा VIDEO VIRAL

हा व्हिडिओ सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी स्टंटचे बरेच व्हिडीओ बघितले असतील मात्र, इतका खतरनाक व्हिडीओ आपण पहिल्यांदाच बघितला असेल. खरं तर असे स्टंट अनेक वर्षांच्या सरावानंतर केले जातात. त्यामुळे आपल्यापैकी कुणीही याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन देखील करण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video russian stuntman flies through car internet calls him human bullet prp

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×