Viral Video: शाळा म्हटलं की, आपल्या अनेक जुन्या आठवणी ताज्या होतात. शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी नेहमीच आपल्या स्मरणात असतात. हल्ली गावाकडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यामध्ये काही विद्यार्थीनी शाळेसमोरच्या मैदानावर सुंदर लावणी सादर कराना दिसत आहेत, यावेळी या लावणी करणाऱ्या ग्रुपमधील एका विद्यार्थीनीच्या लावणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण विविध गाण्यांवर डान्स करून आपली कला सादर करतो. हल्ली सोशल मीडियावर जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत, ज्यावर लोक डान्स करताना दिसतात. त्यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. आता असाच एक डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात विद्यार्थिनी वाजले की बारा या गाण्यावर नाचताना दिसतेय.
हल्ली समाजमाध्यमांवर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका शालेय विद्यार्थीनीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शालेय विद्यार्थीनी शाळेच्या गणवेश घालून शाळेसमोरच्या मैदानावर “वाजले की बारा”, या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून युजर्सही तिचं कौतुक करत आहेत. तिचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pai_.sudeepthi._ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सहा मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “कडक डान्स केला राव” आणखी एकाने लिहिलेय, “एकच नंबर डान्स केला”
