Viral Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर अनेकांसाठी प्रसिद्धी आणि कमाईचे व्यासपीठ बनले आहे. Instagram, YouTube, Facebook यांसारख्या प्लॅटफॉर्मवर लोक आपली कला, कौशल्य, व्यवसाय, दैनंदिन जीवनातील अनुभव आणि वेगवेगळ्या कल्पना व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. एखादा व्हिडीओ आवडला किंवा तो मोठ्या प्रमाणात शेअर झाला, तर काही वेळातच संबंधित व्यक्तीला मोठी ओळख मिळू शकते. डान्स, गायन, अभिनय, स्वयंपाक, फिटनेस, शिक्षण, कॉमेडी, प्रवास अशा विविध क्षेत्रातील अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. फॉलोअर्स आणि व्ह्यूज वाढल्यानंतर जाहिराती, ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सरशिप, अॅफिलिएट मार्केटिंग आणि स्वतःच्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री अशा विविध मार्गांनी कमाईची संधीही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे योग्य नियोजन, सातत्य आणि दर्जेदार कंटेंटच्या माध्यमातून सोशल मीडिया कौशल्याला व्यासपीठ देण्यासोबतच उत्पन्नाचे साधनही बनू शकतो.
हल्ली लहान मुलांमध्येही डान्सची आवड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सोशल मीडियामुळे त्यांना विविध गाणी आणि डान्सच्या स्टेप्स सहज पाहता येतात. अनेक मुलं लोकप्रिय बॉलिवूड आणि मराठी गाण्यांवर भन्नाट डान्स करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांच्या निरागस अंदाजातील डान्सला नेटकऱ्यांकडूनही भरभरून पसंती मिळताना दिसते.
समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील काही जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहेत.
हल्ली फक्त मुलीच नाही तर मुलंही डान्समध्ये उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय गाण्यांवर भन्नाट स्टेप्स करताना लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि डान्स करण्याची अनोखी शैली नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून, या चिमुकल्यांच्या डान्स व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये दोन शाळकरी मुलं निसर्गरम्य परिसरात “हम ऐसे करेंगे प्यार कि दुनिया याद करे” या गाण्यावर उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. हिरवाईने नटलेल्या सुंदर वातावरणात दोघेही गाण्याच्या तालावर सुंदर स्टेप्स करताना पाहायला मिळतात. त्यांच्या निरागस अंदाजातील हा डान्स सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pkuphar01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “काय नाचला रे हा”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “किती छान भावा…”; तर आणखी एकानं लिहिलंय, “खूपच भारी डान्स केला भावाने.”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “लयभारी रे पोरा”
