School Students Viral Video : शाळेमधील विद्यार्थ्यांचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओमध्ये विद्यार्थी गाणी, डान्स तर काहींमध्ये शिक्षकांची शिकण्याची अनोखी पद्धत, तर कधी दोघांमधील नात्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळते. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. अनेकदा शाळेच्या गेटपर्यंत पोहचल्यावर तर अगदी पूर्ण तयार झाल्यावर मोबाईलवर आज शाळेला सुट्टी आहे असा मेसेज आला की, विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नाही आहे. तर आज असेच काहीसे घडले आहे.
व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, आज व्हायरल होणारा व्हिडीओ जानेवारी महिन्यातील आहे; जो सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. शाळेच्या बाहेर काळे ढग जमा झालेले असतात आणि जोरात अवकाळी पाऊस पडत असतो. तेव्हा शिक्षक सुट्टीची घोषणा करतात. सुरुवातीला विद्यार्थी लक्ष देऊन ऐकतात, आणि मग मुलांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू, आनंद दिसू लागतो. त्यातच शिक्षक शांत, प्रेमळ पद्धतीने सांगतात म्हणून तो क्षण अजून खास होऊन जातो.
“या आनंदाची लेव्हलच वेगळी असते” (Viral Video)
तुम्ही पाहू शकता विद्यार्थी गणवेश घालून शाळेत जायला तयार असतात. तितक्यात शिक्षक सुट्टीची बातमी पालकांपर्यंत पोहचवतात. मग सुट्टी आहे एकताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नाही. मोठा भाऊ तर लहान भावाला उचलून गोल-गोल फिरवतो. तर दुसरा विद्यार्थी नकळत आईच्या जाऊन पाया पडतो आणि जोरजोरात आनंदाने नाचायला लागतो. सुट्टी मिळणे विद्यार्थ्यांना एखाद्या सरप्राईज गिफ्टपेक्षा कमी नसते. रोजच्या अभ्यासातून ब्रेक मिळतो, अवकाळी पावसाचा आनंद घेण्याची संधी मिळते, घरी जाऊन गरमागरम जेवण जेवण्याची आणि आराम करण्याचे सुख या एका सुट्टीमध्ये दडलेलं असतं.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @punjabinature.1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ दाखवतो की, छोट्या गोष्टींमुळे खूप मोठा आनंद मिळू शकतो. तो आपल्याला आपल्या शाळेच्या दिवसांची आठवण करून देतो. असे साधे पण आनंदाचे क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “मला या व्हिडीओत संस्कार दिसतं आहेत” , “व्हा तुम्ही शाळेसाठी पूर्ण तयार होता आणि अचानक मेसेज येतो की आज शाळेला सुट्टी आहे…त्या आनंदाची लेव्हलच वेगळी असते”, “आनंदाच्या क्षणी मुलाने आईच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे प्रेम, आदर आणि संस्काराचे प्रतीक आहे…

