Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

आपण अनेकदा रस्त्यावरील अपघात पाहतो. तेव्हा साहजिकच दोन वाहन चालकांमध्ये भांडणे होतात. काही वेळेला अगदी क्षुल्लक कारणांवरून लोक भांडतात.

(Photo : Youtube/ Guly News)

आपण अनेकदा रस्त्यावरील अपघात पाहतो. तेव्हा साहजिकच दोन वाहन चालकांमध्ये भांडणे होतात. काही वेळेला अगदी क्षुल्लक कारणांवरून लोक भांडतात. तथापि, अनेकदा मोठे वाद टाळण्यासाठी आणि प्रकरण शांत करण्यासाठी भांडणे टाळली जातात, मात्र बऱ्याचदा चुकी कोणाची या गोष्टीवरूनही मोठे वाद होतात.

अशावेळी जर एखाद्याने रागाच्या भरात समोरच्यावर हात उचलला तर प्रकरण गंभीर होऊ शकते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये पाहायला मिळाला, जेव्हा एका महिलेच्या स्कूटीची दुचाकीला एका पुरुषाच्या बाईकची धडक बसली. हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

ग्रेटर नोएडाच्या सोसायटी बेसमेंटमध्ये एका दुचाकीस्वाराची स्कूटीशी टक्कर झाली, त्यानंतर दुचाकीस्वाराने महिलेसोबत क्रूर वर्तन केले. त्या व्यक्तीने महिलेला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याने मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कैद झाले असून पोलिसांनी तपास केला असता ही बाब समोर आली.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुण महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या तरुणावर कलाम १५१ ची कारवाई केली आहे. प्रकरण दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत पुन्हा चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video scooty and bike collide you will get angry when you see what the young man did with the girl pvp

Next Story
PM Modi Visit Europe: “तुम्ही आयकॉन आहात..”; चिमुकलीने पंतप्रधान मोदींना दिलेल्या खास भेटवस्तूची सर्वत्र चर्चा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी