Security Guard Lunch Menu Viral Video : सध्या सोशल मीडियावर दैनंदिन आयुष्यातील छोटे-मोठे क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. काही जण याला डेली व्लॉग किंवा व्हिडीओ डायरी असेही म्हणतात. अशा व्लॉग्स किंवा रिल्समध्ये एक ठराविक विषय असतो आणि त्याच विषयाभोवती दररोज वेगवेगळ्या स्वरूपात कंटेंट तयार केला जातो.
सध्या सोशल मीडियावर एका सिक्युरिटी गार्डचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो दररोज ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या जेवणात कोणते पदार्थ असतात याबद्दल प्रेक्षकांना दाखवतो. जेवण असलेली एक प्लास्टिकची पिशवी उघडून सुरक्षा रक्षक म्हणतो की, तर मित्रांनो. हे बघा माझं जेवण. या जेवणाचे कंपनी फक्त १० रुपये घेते. बाहेर हेच जेवण ५० ते १० रुपयांना मिळत असणार”. असे सांगून तो पिशवी उघडतो आणि या जेवणात पापड, कारल्याची भाजी , भाजी, कांदा, भात आणि डाळ आदी पदार्थांचा समावेश असतो.
त्याला कंपनीकडून फक्त १० रुपयांमध्ये अगदी घरच्यासारखं जेवण मिळते आणि या जेवणाच्या पदार्थांमध्ये विविधता देखील दिसते आहे. त्यामुळे अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून नवल व्यक्त करताना दिसत आहेत. कारण – काही कंपन्यांमध्ये जेवण तर सोडा अगदी चहा पिण्यासाठी सुद्धा स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकाच्या कंपनीत १० रुपयांत घरच्यासारखं जेवण मिळतेय हे पाहून अनेक जण आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thenameisanand01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कंपनीच्या परवडणाऱ्या जेवणाचे कौतुक करत “कोणती कंपनी?”, “भावा मला पण इकडे नोकरी बघ”, ““कंपनीच्या मालकाला देव आशीर्वाद देवो”, “एक माणूस आपल्या कुटुंबासाठी सर्व काही करू शकतो.”, “स्वस्थ राहा, मस्त राहा. एन्जॉय करा” अशा कौतुकास्पद कमेंट, तर काही जणांनी “अन्न प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कंटेनरमध्ये पॅक करून द्यायालाहवे होते”, “कंपनीने पॅकेजिंग थोडे बदलले पाहिजे”,“तुमची कंपनी जेवण पुरवते हे छान आहे, पण ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये का दिले जाते? त्याऐवजी डब्यात पॅक करून देता येणार नाही का?” आदी काळजी देखील व्यक्त केली आहे.सुद्धा
