Security Guard Singing Song Viral Video : स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी कधी आपली आवड बाजूला ठेवून समोर येणाऱ्या संधी (नोकरी) स्वीकाराव्या लागतात. पण जेव्हा कोणी विचारतं, “ही नोकरी का निवडलीस?”, तेव्हा आपण मागे सोडलेल्या आवडी पुन्हा आठवतात. पण, मग कधीतरी पुन्हा एक संधी मिळते त्या आवडीला जगण्याची. तेव्हा आपण आपली खरी क्षमता कलेद्वारे समोरच्याला दाखवून देतो. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये सिक्युरिटी गार्डची लपलेली कला सगळ्यांसमोर आली आहे.

इन्स्टाग्राम यूजर अक्षय सिंग राजपूत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका हाऊसिंग सोसायटीच्या सिक्युरिटी गार्ड दिग्गज गायक नुसरत फतेह अली खान यांचं “दिल पे जख्म खाते हैं” हे गाणं अप्रतिमपणे गाताना दिसतो आहे. तो गार्ड आपल्या युनिफॉर्ममध्ये अगदी साधेपणाने बसलेला दिसतो. पण, जसं तो गाणं गायला सुरुवात करतो. तसं पूर्ण वातावरणच बदलून जाते. त्यामुळे त्याची कला दाखवून देतं की, टॅलेंट कोणत्याही पदावर अवलंबून नसतं.

“टॅलेंटला स्टेजची गरज नसते” (Viral Video)

त्याच्या आवाजात ताकद आणि वेदना दोन्ही जाणवतात. त्याच्या बोटांची हालचालही जणू तो हार्मोनियम वाजवत आहे असेच वाटते आहे. रोजच्या कामात व्यस्त असलेला एक साधा माणूस, पण त्याच्यात लपलेलं असामान्य टॅलेंट सगळ्यांसमोर येतं, जे खरंच विलक्षण वाटतं. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं की, इतकं अवघड गाणं किती सहजतेने सादर केलं, जे अनेक प्रशिक्षित गायकांसाठीही कठीण असतं. काहींनी असंही म्हटलं की अजून कितीतरी अशी लपलेली टॅलेंट्स आहेत, जी कुठेतरी संधीची वाट पाहत आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shaivites_akshay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी आणि काही प्रसिद्ध ब्रँडने व्हिडिओ पाहून “हे खरंच अंगावर काटा आणणारं आहे”, “टॅलेंटला स्टेजची गरज नसते, ते स्वतःचा मार्ग शोधतं येतं”, “थांब भाऊ माईक घेऊन येतोय रेकॉर्ड करायला”, “टॅलेंट सगळ्यांच्या नजरेसमोर असतं, फक्त ते ओळखण्याची गरज असते”, “कधी कधी पोटासाठी नोकरी करावी लागते. पण मन मात्र नेहमी आपल्या आवडीमध्येच जगत असतं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.