security guard cover himself with mosquito net viral video : हिवाळ्यात डासांचा वावर प्रचंड वेगाने वाढतो. संध्याकाळ झाली की, आई दार, खिडक्या लावण्यासाठी प्रचंड आरडाओरडा करत असते. कारण – मग रात्रभर डास अवतीभवती फिरू लागतात. जेव्हा तुम्ही संध्याकाळी कुठेतरी बसलेले किंवा उभे असता तेव्हा तुमच्या डोक्यावर डासांचा थवा फिरू लागतो. तर आज सोशल मीडियावर डासांपासून (मच्छर) स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिक्युरिटी गार्डने अजब डोकं लावलं आहे.

आजूबाजूच्या परिसरात वाढलेल्या डासांच्या त्रासाला कंटाळून हैदराबादमधील नाईट शिफ्टवर ड्युटी करत असताना, एका सुरक्षा रक्षकाने स्वतःला मच्छरदाणीत गुंडाळून घेण्याचा निर्णय घेतला. हा सुरक्षा रक्षक सोसायटीच्या आवारात एका खुर्चीवर बसलेला दिसतो आहे. देखरेखीबरोबर तो डासांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याने हा जबरदस्त उपाय केलेला दिसतो आहे.

लहान काम करणाऱ्यांकडे कमीपणाने पाहण्याची वृत्ती (Viral Video)

काही लोकांनी त्या सुरक्षा रक्षकाच्या हुशारीचे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. पण, दुसऱ्या काही लोकांनी प्रशासनाने या समस्येच्या मुळ कारणांवर लगेच उपाययोजना करायला हव्यात असे सांगितले. अनेकांच्या मते, ही घटना फक्त एक प्रसंग नसून शहरातील सार्वजनिक आरोग्य आणि पायाभूत सुविधांमधील उणिवा दाखवणारा एक मोठा इशारा आहे. त्यामुळे या समस्या लवकरात लवकर सोडवणे खूप गरजेचे आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @SurajKrBauddh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “सामाजिक स्तर, आर्थिक स्थिती आणि शिक्षण यामुळे काही लोकांमध्ये “लहान काम” करणाऱ्यांकडे कमीपणाने पाहण्याची वृत्ती दिसते”, “हे फक्त पैशांबद्दल नाही, तर माणुसकी आणि करुणेबद्दल आहे. आपण इतके स्वार्थी झालो आहोत की, आपल्या गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या माणसाचं दुःखही आपल्याला दिसत नाही. ही आजच्या भारताची दुर्दैवी वास्तवता आहे”, “जो माणूस दररोज रात्री तुमच्या कुटुंबाची सुरक्षा करतो. त्याला किमान बसण्यासाठी सुरक्षित जागा, थोडी विश्रांती आणि सन्मानाने जगण्याचा हक्क तरी मिळायलाच हवा. आदर देण्यासाठी काही खर्च लागत नाही, पण दुर्लक्ष करणे हा मात्र एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असतो” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…