scorecardresearch

शाहरुख खानचा दिव्यांग फॅनसोबत ‘Chhaiya Chhaiya’ गाण्यावर डान्स; VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

शाहरूख खानचा एका दिव्यांग फॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक होऊ लागलेत.

शाहरुख खानचा दिव्यांग फॅनसोबत ‘Chhaiya Chhaiya’ गाण्यावर डान्स; VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल
(Photo: Twitter/ barfipayyan)

Shah Rukh Khan Video: ‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान लाखो लोकांच्या मनावर राज्य करतो. शाहरूख खान त्याच्या चाहत्यांसोबत अनेकदा प्रेमाने वागतो आणि त्याची ही स्टाईल लोकांना खूपच भावते. सध्या त्याचा अशाच एका दिव्यांग फॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक होऊ लागलेत.

शाहरूख खानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी रिअॅलिटी शो सारे ग म प लिल चॅम्पच्या स्टेजचा आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याच्या एका चाहतीचं स्वप्न पूर्ण करताना दिसत आहे. ही फॅन दिव्यांग आहे, पण तिच्या आवडत्या अभिनेत्याचे गाणे ऐकताच ती स्टेजवर डान्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. शाहरुखची ही चाहती लहानपणापासूनच चालू शकत नाही, त्यामुळे ती व्हीलचेअरवर दिसतेय.

आणखी वाचा : नाशिक हादरलं….मैत्रीला नकार दिला म्हणून दिवसाढवळ्या पेट्रोल पंच कर्मचारी महिलेवर केला चाकूने वार, घटनेचा VIDEO VIRAL

शाहरुख खानचा हा थ्रोबॅक व्हिडीओ निगार परवीनने शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना निगारने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तो केवळ बॉलिवूडचा राजा नाही, तर लाखो हृदयांचा राजाही आहे. तो केवळ एक चांगला स्टार नाही तर एक चांगला पिता, पती आणि एक महान माणूस देखील आहे. मला शाहरुख खान खूप आवडतो.’

आणखी वाचा : Dosa Printer: कधी विचार केला होता का? ‘डोसा प्रिंटर’ही येईल, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क झाले

शाहरुख खानचा हा व्हिडीओ पाहून सारेज चण भावूक होत आहेत. हा व्हिडीओ जसा जुना असून २०१७ चा आहे. ज्यामध्ये शाहरुख त्याच्या फॅन्ससोबत ‘छैय्या छैय्या’वर डान्स करताना दिसत आहे. शाहरुख खानच्या या फॅनला चालता येत नाही, म्हणून शाहरुखनेही आपले गुडघे टेकून खाली बसून आपल्या लाडक्या फॅनसोबत डान्स केलाय. या व्हिडीओच्या शेवटी शाहरुख त्याच्या चाहतीला प्रेमाने मिठी मारतो आणि नंतर तिच्या पालकांनाही भेटतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लंडनमध्ये ‘बैलपोळा’! ब्रिटनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सुनक यांनी पत्नीसोबत केले गोपूजन

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कोरियन आईने मुलाला भारतीय राष्ट्रगीत शिकवले, गोंडस मुलाने कसं गायलं “जन-गण-मन…”, पाहा VIRAL VIDEO

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो ‘पठाण’मध्येही दिसणार आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोणसोबत त्याची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. जॉन अब्राहम देखील या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. याशिवाय शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपटही या लाइनमध्ये आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत तापसी पन्नू दिसणार आहे. शाहरुख खानचा शेवटचा रिलीज झालेला ‘झिरो’ हा २०१८ मध्ये रिलीज झाला होता. मात्र, अलीकडे शाहरुख २ चित्रपटांमध्ये कॅमिओ करताना दिसला आहे. ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ हे चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या