लहान मुलांना आपण ज्या गोष्टी शिकवू त्यांचे ते तंतोतंत पालन करतात. ज्याप्रकारे ओल्या मातीला नीट आकार दिला की त्यातून सुंदर मूर्ती साकारता येते, त्याप्रमाणे लहान असतानाच मुलांना चांगले संस्कार दिले की तर त्यांचा व्यक्तीमत्त्व विकास होण्यास मदत होते. त्यामुळे पालकांनी मुलांना सुरवातीपासूनच चांगल्या गोष्टी शिकवण्याचा सल्ला दिला जातो. घरातील वातावरणासह अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींचाही मुलांच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असतो. याचीच प्रचिती येणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणारे अधिकारी अवनीश शरण यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ जपानमधील एका शाळेतील आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलांबरोबर एक एक्टिवीटी करण्यात येत आहे, ज्याद्वारे मुलांना सभ्य वागणूक शिकवली जात आहे. पाहा यातून मुलांना काय शिकवण्यात येत आहे.

आणखी वाचा: चक्क चिप्सच्या पाकीटात बनवले ऑम्लेट! Viral Video वर नेटकऱ्यांनी नाराजी का व्यक्ती केली एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

या व्हिडीओमध्ये मुलं बसमध्ये बसल्याप्रमाणे रांगेत बसली आहेत. बसमध्ये एका मागोमाग एक प्रवासी येत आहेत. त्यामध्ये वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला, लहान बाळाला घेऊन प्रवास करणारी महिला यांचा समावेश असलेला दिसत आहे. जेव्हा अशा व्यक्ती ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना बसण्यासाठी जागा द्यावी अशी शिकवण यातून देण्यात येत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा.

आणखी वाचा: हे प्राणी आहेत की माणसं? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Viral Video

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

आणखी वाचा: कुत्र्याला जेवू घालण्यासाठी नवरीने चक्क…; नेटकऱ्यांची मनं जिंकणारा Viral Video पाहिलात का?

या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, मुलांना सभ्य वागणूक शिकवण्याच्या या पद्धतीचे अनुकरण प्रत्येक शाळेत व्हावे अशी इच्छा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shared by ias officer awanish sharan shows kids being taught courtesy lessons in japan school pns
First published on: 10-12-2022 at 10:57 IST