3-Year-Old Girl Dance Video: सध्या सोशल मीडियावर लहानग्यांचे हटके आणि मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. या चिमुकल्यांच्या निरागस, पण तितक्याच जबरदस्त अदा पाहून अनेकदा प्रेक्षक थक्क होऊन जातात. कधी कधी या छोट्या बहाद्दरांची उत्तरं प्रौढांनाही विचार करायला लावतात, तर कधी त्यांच्या प्रश्नांनी चक्क अवाक व्हायला होतं. अशाच व्हिडीओंमध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे लहान मुलांच्या डान्स व्हिडीओंना. अगदी एखाद्या मोठ्या व्यक्तीलाही लाजवेल असा आत्मविश्वास, कमाल स्टेप्स व उत्साही हावभाव यांनी सजलेला डान्स पाहून अनेक जण म्हणतात, “टॅलेंट वय पाहत नाही.” सध्या असाच एक भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात एका चिमुकलीनं असा जलवा दाखवला की, प्रेक्षक भारावून गेलेत.
सध्या सोशल मीडियावर एक तीन वर्षांची चिमुरडी आपल्या भन्नाट डान्सनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या २० सेकंदांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही वाटेल, एवढ्याशा वयात इतकी कमाल एनर्जी, एक्स्प्रेशन व कॉन्फिडन्स कुठून येतो? हा व्हिडीओ एका सार्वजनिक पार्कमधील असून, त्यात तीन ते पाच वर्षांची अनेक लहान मुलं एकत्र दिसत आहेत. मात्र, त्यातील एक चिमुरडी आपल्या जबरदस्त डान्स स्टेप्सनी सगळ्यांवर छाप सोडते.
विशेष म्हणजे ही मुलगी आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर शकिराच्या गाण्यावर डान्स करताना दिसते आणि तिचे स्टेप्ससह हावभाव इतके नेमके आणि आत्मविश्वासपूर्ण आहेत की, मोठमोठे डान्सरही काही वेळ विचारात पडतील. तिच्या लवचिक हालचाली, फेस एक्स्प्रेशन्स व टायमिंग पाहून अनेकांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
हा व्हिडीओ ‘MhutniKeMemes’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून, काही तासांतच तो हजारोंनी पाहिला आणि शेअरही केला आहे. अनेकांनी या चिमुकलीला “मासूम; पण सुपरस्टार”, “नन्ही शकीरा”, “टॅलेंटेड परी” अशा उपाध्या दिल्या आहेत. काहींनी तिच्या आत्मविश्वासाचं, “टॅलेंट वय पाहत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”, या शब्दांत खास कौतुक केलंय.
येथे पाहा व्हिडीओ
या व्हिडीओबाबत अजूनही हे स्पष्ट नाही की, तो कुठल्या शहरातील आहे किंवा नेमका कधी चित्रित करण्यात आला. पण, त्यात दिसणाऱ्या चिमुकलीनं सोशल मीडियावर खूप मोठा प्रभाव टाकलाय. तिच्या डान्सनं लोकांना एक वेगळीच ऊर्जा दिली आहे आणि हा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.
शब्दश: सांगायचं तर एवढ्या लहान वयात एवढा मोठा जलवा, असंच म्हणता येईल. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू येईल आणि थक्कही व्हाल. कारण- ही चिमुरडी खरंच सुपरस्टार आहे.