Viral Video Shows father son duo Sing Atif Aslam song : आपण कितीही मॉडर्न काळात वावरत असलो तरीही ९० च्या दशकातील बरीच गाणी सध्या ट्रेंड म्हणून इन्स्टाग्रामवर रीलमार्फत व्हायरल होताना दिसतात. जुने चित्रपट म्हणा किंवा त्यांच्यातील गाणी आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. तर, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्येही (Viral Video) असंच काहीसं पाहायला मिळालं. ९० च्या दशकातील एका प्रसिद्ध गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. कारण- आज एक बाबा-लेकाची जोडी सुंदर गाणं सादर करताना दिसली आहे.

२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या कलियुग या चित्रपटातील ‘आदत’ हे गाणं आपल्यातील बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. हे गाणं चित्रपटात आतिफ अस्लमनं गायलं आहे. पण, आज हे गाणं बाबा-लेकाच्या जोडीनं सादर करून दाखवलं आहे. लेकानं हातात गिटार धरलं आहे आणि बाबा गिटारच्या तालावर त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजात ‘जुदा होके भी, तू मुझमें कहीं बाकी है…’ गाणं गाण्यास सुरुवात करतात. बाबा-लेकाचा व्हायरल व्हिडीओ (Viral Video) एकदा तुम्हीसुद्धा बघा…

Shocking video of three Boys seriously injured in motorcycle stunt crash video
“जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” भर रस्त्यात तरुणांबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Littele boys took blessings from cow heart touching video
“शेवटी पेराल तेच उगवणार” लहान मुलांच्या एका कृतीनं जिंकली लाखो लोकांची मनं; VIDEO पाहून कळेल संस्कार किती महत्त्वाचे
leopard and pig video viral
‘आयुष्यात एकतरी मित्र असा हवा…’ बिबट्याने मित्राला पकडल्यावर दुसऱ्याने वापरली युक्ती… VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
funny video goes viral
“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Viral Video Shows The young man got dizzy in the metro
VIRAL VIDEO : ‘आई कुणाचीही असो…’ मेट्रोमध्ये सगळ्यांनी केलं दुर्लक्ष पण महिलेच्या ‘त्या’ कृतीने जिंकली सगळ्यांची मनं

हेही वाचा…‘भावानं जग जिंकलं…’ आईच्या खांद्यावर हात ठेवून लेकरानं बसवलं नवीन गाडीत; VIRAL VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

व्हिडीओ नक्की बघा…

‘जुदा होके भी, तू मुझमें कहीं बाकी है…’

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, लेकाच्या गिटारच्या तालावर बाबा हावभाव देत, त्यांच्या मधुर आवाजात गाणं गात आहेत. त्यांचा आवाज ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. दोघांनी असे व्हिडीओ पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बऱ्याच व्हिडीओमध्ये बाबा एकटेच गाणं सादर करतात; पण काही व्हिडीओमध्ये त्यांचा लेकसुद्धा त्यांना गिटार वाजवून साथ देत असतो. त्यामुळे त्यांच्या व्हिडीओचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसत असतं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @singer_jagdish_kandpal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच आतिफ अस्लमने गायलेलं जुदा होके भी गाणं बाबा-लेकाच्या जोडीनं कव्हर केलं, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून आणि बाबांचा मधुर आवाज ऐकून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत. काही जणांना ही जोडी खूपच आवडली आहे. अनेक जण हार्ट इमोजीसह ‘ही जोडी खूप मस्त आहे’, ‘खूप छान गाताय’, या शब्दांत कमेंट्समध्ये कौतुक करताना दिसत आहेत.