Viral Video Of grandfather And his grandson : आजी-आजोबा आणि नातवंड एकमेकांचे चांगले मित्र असतात. तर नातवंड सुद्धा आजी-आजोबांना बेस्ट फ्रेंड मानतात. नातवाला शाळेत सोडायला जाणे, एक तारखेला पेन्शन आल्यावर आवडीचा खाऊ घेऊन येणे, गावाला जाताना नातवंडांच्या हातावर पैसे टेकवणे आदी अनेक गोष्टी आजी-आजोबा नातवंडांसाठी करत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये भर पावसात चालणाऱ्या आजोबा-नातवाचा एक सुंदर क्षण कैद करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) जोरदार पाऊस पडत आहे. रस्त्यावर खूप पाणी भरलेलं दिसत आहे. या भरपावसात आजोबा नातवंडाला शाळेत सोडायला जात आहेत. नातवाने तर रेनकोट घातला आहे, पण आजोबा पावसात भिजत, नातवाचा हात पकडून चालताना दिसत आहेत. या दोघांना चालताना पाहून एका तरुणीला तिच्या आजोबांची आठवण झाली. तिने हा क्षण तिच्या मोबाईलमध्ये कैद करून घेतला आणि एक भावूक पोस्ट लिहिली आहे. तरुणीने पोस्टमध्ये काय लिहिलं आहे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
a girl child shows humanity
संस्काराशिवाय आयुष्य काहीच नाही! चिमुकलीने दाखवली माणुसकी, वृद्धी व्यक्तीला पाजले पाणी, पाहा VIDEO VIRAL
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
Maharashtrian old couple emotional video
आयुष्यभर नि:स्वार्थ प्रेम करणारा जोडीदार भेटायला भाग्य लागतं! मराठमोळ्या आजी आजोबांचा VIDEO होतोय व्हायरल
2G era video
‘विसरू नको रे आई-बापाला’; 2G च्या काळातील VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवलं बालपण
a son fulfilled parents dream Parents sat on a plane for the first time in their life
आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसले आईवडील , लेकाने केले स्वप्न पूर्ण; VIDEO होतोय व्हायरल
Importance of father in life
“घर सोडलं की बाप कळतो…” तरुणाने सांगितले वडीलांचे महत्त्व, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा…‘माझी बेस्ट फ्रेंड…’ आजी म्हणतेयं गाणं, लहान मुलांसारखा डान्स करतोय श्वान, VIRAL VIDEO तून पाहा दोघांची खास मैत्री

व्हिडीओ नक्की बघा…

अभी ना जाओ छोड कर…

व्हायरल व्हिडीओला तुम्ही पाहिलं असेल की, १९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या हम दोनो या चित्रपटातील ‘अभी ना जाओ छोड कर’ हे गाणं या बॅकग्राऊण्डला लावलं आहे. तसेच नातवाला आणि आजोबांना हातात हात धरून चालताना पाहून तरुणी म्हणाली की, ‘माझ्या आजोबा शाळा सुटल्यानंतर मला उचलून घरी घेऊन यायचे आणि एक आईस्क्रीम विकत घेऊन द्यायचे ही एक आठवण माझ्याकडे आहे. आयुष्य इतके वेगाने पुढे सरकले की, आजोबांनी मला शाळेतून येताना उचलून आणले ही आता फक्त एक गोड आठवण माझ्याकडे आहे. हे दृश्य पाहून तरुणी पुढे म्हणाली की, मला पुन्हा ती लहान मुलगी व्हायचं आहे, जेव्हा शाळेतू येताना तिचे आजोबा तिला आईस्क्रीम द्यायचे. वेळ खूप लवकर निघून जाते, त्यामुळे त्यांच्याबरोबर जे क्षण जगायला मिळत आहेत त्यांची कदर करा. कारण हे सर्व क्षण अचानक केव्हा फक्त आठवणी बनून जातील हे कळत सुद्धा नाही’ ; अशी कॅप्शन तरुणीने या व्हिडीओला दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @siyaaaaaa13 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या आजोबांची आठवण झाली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘आजी-आजोबांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे’, तर दुसरा म्हणतोय की, ‘माझे आजोबा सुद्धा मला असेच शाळेत सोडायला यायचे’, तर अनेक जण त्यांच्या आजी-आजोबांच्या आठवणीत भावूक होत विविध शब्दात त्यांच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसत आहेत.

Story img Loader