Video Shows Woman Riding A Scooter With A Parrot : सोशल मीडियावर अनेकदा बंगळुरूच्या मजेशीर गोष्टी व्हायरल होत असतात; ज्यामध्ये हेलिकॉप्टरमुळे ट्रॅफिक जाम होणे, ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे लॅपटॉप उघडून काम करणे, रस्त्याकडेने वरात जातेय हे पाहून नाचायला जाणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. तर आज एक अनोखा व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे, तुम्ही आतापर्यंत अनेक मालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना कार, बाईकवरून घेऊन जाताना पहिले असेल. पण, आज ट्रॅफिकदरम्यान एका महिलेने केलेलं कृत्य पाहून तुम्हाला हसू येईल आणि आश्चर्यही वाटेल.

व्हायरल व्हिडीओ बंगळुरूचा आहे. ट्रॅफिकदरम्यान एक्स (ट्विटर) युजर राहुल जाधव रिक्षातून प्रवास करत होता. या दरम्यान त्याला एक महिला दिसली. ही महिला स्कुटीरवरून तिच्या मैत्रिणीबरोबर विनाहेल्मेट प्रवास करत होती. फक्त एवढेच नाही तर तिच्या खांद्यावर पोपटसुद्धा बसलेला दिसतो आहे. त्याला हे दृश्य पाहून आश्चर्य वाटले आणि त्याने या गोष्टीचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून घेतला. स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या पोपटाचा व्हिडीओ (Video) एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

https://twitter.com/iRahulJadhav/status/1895380063618838833

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, रिक्षातून हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. दोन्ही मैत्रिणी स्कुटीरून प्रवास करत आहेत. त्यादरम्यान स्कूटर चालवणाऱ्या मैत्रिणीच्या खांद्यावर रंगीबेरंगी पोपटसुद्धा बसला आहे आणि हा पोपट तिला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. प्राण्यांना बंदिस्त (पिंजऱ्यात) ठेवण्यापेक्षा त्यांना हवेतसे स्वातंत्र दिले पाहिजे, हे दाखवणारा हा उत्तम व्हिडीओ आहे, असे म्हणायला हरकत नाही.

ड्रायव्हिंग टेस्ट पास झाली…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @iRahulJadhav या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. “ड्रायव्हिंग टेस्ट पास झाली”, “पोपट तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे,” “पीक बंगळुरू मोमेंट” (peak bengaluru moment ), तसेच काही जण विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या महिलेला फटकारताना दिसत आहेत आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.