Viral Video Show Elderly Couple Dancing At Mohit Chauhan’s Concert : सुख-दुःखात साथ देणारा जोडीदार लाभला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण अगदी खास होऊन जातो. त्यासाठी नात्यात कायम एक प्रकारचा गोडवा असला पाहिजे. हा गोडवा कसा राहील हे आपल्या हातात असतं. एकमेकांना वेळ देत राहिला तर हे नातं वर्षानुवर्षे पुढे जात राहतं. पण, सध्या स्वार्थापोटी अनेक नाती टिकवली जातात; तर आजच्या पिढीला खरं प्रेम वर्षानुवर्षे कसं दिसतं हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक वृद्ध जोडपं एका गाण्यावर डान्स करताना दिसले आहेत.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) बिहारचा आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (IGIMS) येथे गायक मोहित चौहान परफॉर्म करत होता, तर मोहित चौहान लाइव्ह कॉन्सर्टमध्ये २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला बॉलीवूडचा ‘तमाशा’ चित्रपटातील ‘मटरगष्टी’ (Matargashti) गाणं गाण्यास सुरुवात करतो. तेव्हा या गाण्यावर तरुण मंडळी नाही तर एक वृद्ध जोडपं रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. वृद्ध जोडप्याने या गाण्यावर कसा डान्स केला, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
bangladesh boy recording TikTok video with friends hit by train survives Video Viral
“सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘प्रत्येक बायकोचं स्वप्न…’, दिवाळीनिमित्त दिलं हटके गिफ्ट; बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवणाऱ्या नवऱ्याचं होतंय कौतुक

व्हिडीओ नक्की बघा….

जोडीदार असा असेल तर…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, मोहित चौहान गाणं गाण्यास सुरुवात करतात. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अनेक फॅन्सची प्रचंड गर्दी असते. यादरम्यान काही तरुण मंडळी गाणं ऐकत असतात, काही जण मोबाइलमध्ये क्षण कॅप्चर करत असतात. पण, या सगळ्यामध्ये एक वृद्ध जोडपं मात्र हा क्षण जगताना दिसतात. कारण आजी-आजोबा हातात हात धरून या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसले आहेत. हा डान्स पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, वय म्हणजे फक्त एक आकडा आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर विकास वर्मा यांच्या @patnaplanet या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘दिल तो बच्चा है जी!’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून कमेंटमध्ये प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, जोडीदार असा असेल तर लग्न करायला काय हरकत आहे. तर दुसरा म्हणतोय की, जर तुम्ही योग्य व्यक्तीशी लग्न केले तर बदलत्या वर्षात तुमचे आयुष्य आणखीन सुंदर बनत जाते’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader