Viral Video Auto Driver Winter Jugaad : थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक गरम कपडे घालून बाहेर पडण्यास प्राधान्य देतात. ट्रेन, बस असो किंवा रिक्षातून प्रवास करताना अगदी जॅकेट घालून, स्कार्फ बांधून, तोंडाला मास्क लावून थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात असतात. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये रिक्षा चालकाने स्वतःचे आणि प्रवासात प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी जबरदस्त जुगाड केलेला दिसतो आहे.
थंडीच्या दिवसात रिक्षा कॅबसारखी सोय देत नसली तरीही चालकाने आपल्या रिक्षाच्या दोन्ही बाजूंना जाड पडदे लावले आहेत. ड्रायव्हरच्या बाजूला तर त्याने पडद्याच्या मधोमध पारदर्शक (ट्रान्सपेरंट) शीटही बसवली आहे; ज्यामुळे त्याला रस्त्यावरील गोष्टीही स्पष्ट दिसतील. रिक्षा चालकाने प्रवाशांसाठी केलेली व्यवस्था पाहून रिक्षात बसलेल्या व्यक्तीने व्हिडीओ काढून व्हायरल केला आहे.
कॅब नाही रिक्षा (Viral Video)
रिक्षात बसलेल्या व्यक्तीने थंडीमुळे सगळ्यात पहिला कॅब बूक करण्याचा विचार केला होता. पण, थंडीपासून संरक्षण करणारी ही रिक्षा पाहून त्याने स्वतः विचार बदलला आणि त्याच्या कॅबच्या अतिरिक्त खर्चातही बचत झाली. प्रवासी प्रवासादरम्यान रिक्षाच्या आतील दृश्य दाखवतो आणि कशाप्रकारे सजावट केली आहे; या गोष्टीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. रिक्षात बसल्यावर केस खराब होतात, थंडीमुळे अंगावर शहारे येतात. त्यामुळे रिक्षा चालकाने या गोष्टीचा विचार करून दोन्ही बाजूंना जाड पडदे लावून घेतले आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/reels/DSXOfJAksDq
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी कॅब चालकांनी केलेल्या या व्यवस्थेला “Z+” सुरक्षा म्हणत आहेत. “जर सर्व रिक्षा चालकांना असे पडदे मिळाले तर कॅब बंद होतील”, “याला ऑटोमॅटिक कार म्हणा”, “वेळेवर तुमच्या मदतीला येणारी कोणतीही गोष्ट सर्वोत्तम असते, मग ती कॅब असो किंवा ऑटो” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
