Viral Video Of Bride And Groom : लग्नात जबरदस्त एन्ट्री व्हावी म्हणून अनेक जण अगदी हद्दच पार करतात. प्रत्येक नवदाम्पत्य आपल्या लग्नाचा सोहळा खास करण्यासाठी काही ना काही हटके करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यात डान्स करत एन्ट्री करणे म्हणजे जणू आता काही ट्रेंडच सुरू झाला आहे. काहींची रॉयल एन्ट्री तर काहींचा भन्नाट डान्स, काहींचे हटके कपडे तर काहींच्या रुखवताचा थाट असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्यासमोर येतात. पण, आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्याला कशाचीच तोड नाही.
व्हायरल व्हिडीओ नवदाम्पत्याचा आहे. सगळे नवरा-नवरीच्या एन्ट्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. फोटोग्राफर व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतात. कारच्या सनरूफमध्ये नवरा-नवरी हातात फायर गन घेऊ उभे असतात. नवरीच्या हातातील फायर गन फुटते आणि सगळ्यांमध्येच भीतीचे वातावरण पसरते. इथपर्यंत संकट थांबत नाही, तर नवरीच्या हातातील फायर गन फुटल्यामुळे नवऱ्याच्या फेट्याला आग लागते. मग नंतर पुढे काय घडते, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा….
व्हिडीओ नक्की बघा
स्वतःच्या जिवापेक्षा स्टाईल महत्वाची (Viral Video) :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, नवरा-नवरीची गाडीतून मंडपात एन्ट्री होत असते. सनरूफमधून दोघेही अगदी जीवाची पर्वा न करता फायर गन घेऊन नाचत असतात. तेवढ्यात नवरीच्या हातातील फायर गन फुटल्यामुळे नवऱ्याच्या फेट्याला आग लागते. ही गोष्ट नवरदेवाला माहितीच नसते. मंडपात उपस्थित काही अनोळखी मंडळी हे पाहतात आणि नवऱ्याच्या डोक्यावरून तो फेटा काढून टाकतात आणि वेळीच संकट टळते आणि व्हिडीओचा इथेच शेवट होतो.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ma.riya03 आणि @sk0170131 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसताना दिसत आहेत आणि मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. ‘एवढा ड्रामा कशाला करायचा, ज्याने स्वतःचे नुकसान होईल’; ‘नशीब वेळीच फेटा काढून घेतला’, ‘स्वतःच्या जिवापेक्षा स्टाईल महत्त्वाची’, ‘खरंच गरज होती का’; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.