Video Shows Bride Calls Off Marriage : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. तर हा दिवस खास करण्यासाठी अनेक जण छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजन करतात आणि त्यासाठी खूप दिवस आधीपासून पैशांची बचत करायला सुरुवात करतात. पण, याउलट असे काही जण असतात; जे छोट्या कारणांवरून लग्न मोडायला सुद्धा तयार होतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये विधी सुरु असताना सिंदूर लावताना घडलेल्या एका छोट्या गोष्टीमुळे नवरीने लग्न करण्यास नकार दिला आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार व्हायरल व्हिडीओ बिहारच्या कैमूर जिल्ह्यात एका विचित्र घटना घडली आहे. नवरदेव वरात घेऊन नवरीच्या दारात पोहचला. लग्ना दरम्यान विधी सुरु असताना घडलेल्या एका विचित्र घटनेनंतर वधूने लग्न करण्यास नकार दिला. लग्नातील सर्वात महत्वाच्या विधी म्हणजे नवरीच्या भांगेत कुंकू भरताना नवऱ्याचा हात थरथर कापू लागला. हे पाहून नवरी संतापली आणि लग्नाच्या पुढच्या विधी करण्यास नकार दिला.
मी त्याच्याशी लग्न करणार नाही (Viral Video)
एवढेच नाही तर “मुलगा वेडा आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार नाही” असे सुद्धा नवरी म्हणाली. हे ऐकून नवरदेव आणि तिच्या कुटुंबाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, नवरी तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि नवरदेवाशी लग्न करण्यास नकार दिला. ही घटना भाभुआ पोलिस स्टेशन परिसरात घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही कुटुंबांना भाभुआ पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. बराच वेळ चर्चा होऊनही कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर नवरदेवाला नवरीशिवाय घरी परतावे लागले.
व्हिडीओ नक्की बघा…
लग्न रद्द झाल्यानंतर नवरीच्या कुटुंबाने पैसे परत मागितले. पण, नवरदेवाच्या वडिलांनी सांगितले की, “लग्न १ लाख रुपयांना निश्चित झाले होते. ९०,००० रुप्यांपैकी आम्ही ३०,००० रुपये दागिने , २०,००० रुपये साड्या आणि १०,००० रुपये डीजे आणि उर्वरित पैसे वाहतुकीवर खर्च झाले आहेत”. तसेच सर्व विधी पूर्ण झाल्यावर सिंदूर भांगेत भरताना कदाचित आवाजामुळे किंवा दबावामुळे नवरदेवाचा हात थरथरला. हे पाहून नवरीने नवरदेवाला वेडा म्हंटले आणि मग कुटुंबाने पैसे परत मागण्यास सुरुवात केली” .