Driver & Drunk Women Passenger Viral Video : ओला, उबर, रॅपिडो आदी विविध कंपन्यांचे चालक आपल्याला कमीत कमी वेळेत, आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यास मदत करतात. अगदी रात्री घरी पोहचायला उशीर झाला आणि एकही टॅक्सी, रिक्षा उपलब्ध नसेल तर ही मंडळी अगदी कमी वेळात आपल्यासमोर हजर राहतात. पण, अनेकदा यांच्याबरोबर प्रवास करतानाही विशेषतः मुलींना एकटं असल्याचा फायदा घेतील, कधी लॉन्ग कटने घेऊन जातील याची भीती मनात असतेच. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
व्हायरल व्हिडीओ कोलकाता येथील असून कॅब ड्रायव्हरने डॅशकॅमचा फुटेज व्हिडीओद्वारे शेअर केला आहे. या कॅबमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेली एक वारंवार सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची विनंती कॅब ड्रायव्हरकडे करताना दिसते. कॅब ड्रायव्हर सुद्धा तिला व्यवस्थित घरी पोहचवण्याची गोड शब्दात खात्री पटवून देतो. त्यानंतर मग प्रवास सुरु होतो आणि मद्यधुंद महिलेला तिच्या आईचा फोन येतो. महिला घाबरून कॅब ड्रायव्हरकडे फोन देते. मग इथेही कॅब ड्रायव्हर अगदी भावाप्रमाणे तिला सांभाळून घेत “ती वाटेत आहे असे सांगून पालकांना माहिती मिळत राहावी म्हणून लाइव्ह लोकेशनही शेअर करतो”.
“ही माझी ड्युटी आहे” (Viral Video)
उशिरा घरी पोहचल्यावर आई ओरडेल या भीतीने महिला चिंतेत असते. त्यावर ड्रायव्हर गंमतीने म्हणतो की, “तुला तर ओरडलचं पाहिजे. कारण तू एका लाडावलेल्या मुलीसारखी वागत आहेस”. त्यानंतर अखेर प्रवास पूर्ण होतो आणि महिला त्याला मदत केल्याबद्दल आभार मानते. “हे माझे कर्तव्य आहे, आभार मानण्याची गरज नाही. मी यासाठीच पैसे घेतो” ; असे तो अगदी आपुलकीने म्हणताना दिसतो. त्यानंतर प्रवास संपल्यावर तो तिला सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी मदत करताना दिसतो आहे. कॅब ड्रायव्हरने कशाप्रकारे मद्यधुंद महिलेला सुखरूप पोहचवलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.instagram.com/reels/DStxOqpEs0S
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @BombagorerRaja या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत. पण, एका युजरने “मी कुठेतरी वाचले होते; एकटी मुलगी ही संधी नसून एक जबाबदारी असते आणि या व्यक्तीने ते खरे करून दाखवले. छान भाऊ. तुझा आम्हाला अभिमान वाटतो”, “ही माझी ड्युटी आहे, तुम्हाला मला थँक यू म्हणायची गरज नाही; हे किती सहज म्हणून गेला तो”, “तो एक हुशार आणि मेहनती माणूस आहे. भविष्यात अनावश्यक त्रास टाळण्यासाठी अशी परिस्थितीत रेकॉर्ड करून चेहरा ब्लर करणे योग्य आहे. त्याहून जास्त त्याने तिला जबाबदारीने सोडले ते अत्यंत महत्वाचे आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
