Viral Video Shows Daughter And Father Love : आयुष्यात काही क्षण असे असतात, जे शब्दांत मांडता येत नाहीत. आयुष्यातला पहिला पगार असो किंवा एकेक पैसे जोडून आई-वडिलांना दिलेली पहिली भेट असो; प्रत्येकासाठीच ही गोष्ट खूप खास असते. तसेच आपल्या लेकराने दिलेली पहिली भेटवस्तू प्रत्येक आई-वडिलांसाठीसुद्धा मौल्यवान असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लेक बाबांसाठी खास, महागडी भेटवस्तू आणते तेव्हा बाबा काय रिअ‍ॅक्शन देतात चला पाहूयात…

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कंटेंट क्रिएटर @preettduaa प्रीतच्या घरातील आहे. प्रीतचे आई-बाबा हॉलमध्ये बसलेले असतात. दिवाळीनिमित्त तिने तिच्या बाबांसाठी अंगठी बनवून घेतलेली असते. अंगठी एका पर्समधून ती तिच्या बाबांना देते. पर्स उघडताच आतमध्ये अंगठीचा बॉक्स दिसतो. अंगठी कोणासाठी, असं आई विचारते? तेव्हा व्हिडीओ काढणारी अज्ञात व्यक्ती ‘प्रीतने बाबांसाठी अंगठी आणली आहे’ असं सांगते. तेव्हा लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. तर बाबासुद्धा अंगठी न पाहता सोफ्यावरून उठतात आणि प्रीतला अलगद मिठी मारतात. प्रीतच्या बाबांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकू लागतो. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ.

हेही वाचा…“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

व्हिडीओ नक्की बघा…

रिंग बघण्याआधी मुलीला मिठी मारली :

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) शेअर करीत कंटेंट क्रिएटरने लिहिलं, “या दिवाळीत मी माझ्या वडिलांना एक छोटीशी भेट दिली. पण, त्यांनी आमच्यासाठी जे काही केले त्याच्या तुलनेत हे काहीच नाही आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप त्याग केला आहे, नेहमी आमच्या आनंदाला प्राधान्य दिले आहे आणि त्या बदल्यात कधीही काहीही मागितले नाही. त्यांच्यासाठी काहीतरी करायचं हे माझं स्वप्न होतं, ही अंगठी म्हणजे त्यांना माझ्याकडून छोटंसं थँक यू आहे. पण, वर्षानुवर्षे त्यांनी दिलेल्या प्रेम, काळजीपुढे हे काहीच नाही. बाबा, तुम्ही माझा सर्वात मोठा आशीर्वाद आहात…” ; अशी कॅप्शन तिने पोस्टला लिहिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @preettduaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. ‘अनेक मुली हा दिवस पाहण्यासाठी लग्नाआधी करिअर निवडतात’, ‘हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असते’, ‘पप्पांनी रिंग बघण्याआधी मुलीला मिठी मारली’ तर काही जणांच्या व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आलं आहे, असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहचला आहे.

Story img Loader