Video Shows Daughter Welcome Her Father At Home With Surprise : कामावरून घरी दमून आल्यावर घरात सुद्धा शांतता असावी असे अनेकदा वाटते. नाहीतरी कधी-कधी घरात पाऊल टाकताच भावंडांची भांडणे, नवरा-बायकोत वाद, किंवा कामाच्या टेन्शनमुळे अनेकदा चिडचिड सुद्धा होते. त्यामुळे घरात पाऊल टाकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असावे आणि घर आनंदी असावी अशीच इच्छा आपल्यातील प्रत्येकाच्या मनात असते. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये बाबांचे अगदी खास स्टाईलमध्ये लेकीने स्वागत केले आहे.

व्हायरल व्हिडीओत बाबा कामातून घरी आलेले असतात. दरवाज्यात बाबा उभे असतात तितक्यात लेक हातात माईक हातात घेते आणि जस्टिन बीबरचं ‘बेबी’ हे गाणं गाण्यास सुरुवात करते. गाण्याची पहिली ओळ ऐकताच बाबांच्या चेहऱ्यावर हसू येते. एवढेच नाही तर लेक जसजशी गाणं गात त्यांच्याजवळ जाते, तेव्हा बाबा सुद्धा तिला साथ द्यायला सुरुवात करतात. दोघेही गाण्याच्या तालावर अगदी बेफान होऊन नाचू लागतात की, व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.

तुझे बाबा रॉकस्टार आहेत (Viral Video)

कामावरून दमून आल्यावर अनेकदा कोणतीच गोष्ट करण्याची इच्छा नसते. त्यामुळे लेकीने बाबांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी त्यांचे स्वागत नाचत-गात करण्याचे ठरवले. अपेक्षेनुसार बाबांनी सुद्धा तिच्या सरप्राईजला योग्य प्रतिसाद देत जबरदस्त डान्स केला आहे. दोघांनी गाण्याच्या तालावर, जबरदस्त एक्स्प्रेशन देत, उस्ताहासह डान्स केला आहे. लेकीने दिलेले सरप्राईज आणि बाबांनी दिलेला गोड प्रतिसाद एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @laveera_6 आणि @ramasubramanyampolamarasetty या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून लेकीचे आणि बाबांच्या डान्सचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. एक युजर म्हणतोय की, “तुझे बाबा रॉकस्टार आहेत”, “कामावरून एवढं थकून आल्यानंतरही त्यांनी कंटाळा न करता मुलीच्या आनंदात सहभागी झाले”, ” तू खूप भाग्यवान आहेस की तुला असे बाबा मिळाले” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसून आले आहेत.