Dog Sits Comfortably On The Roof Of Auto Rikshaw :अनेकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी आपण वैयक्तिक दुचाकी किंवा चारचाकीचा वापर करतो. वैयक्तिक गाडी नसेल तर मग आपण बस, ट्रेन, ओला, उबर किंवा मग जास्त तर रिक्षाचा उपयोग करतो. कारण – रिक्षाचा प्रवास हा सुरक्षित, कमी खर्चिक आणि आरामदायक वाटतो. त्यामुळे अनेक जण रिक्षाने जायला पाहिलं प्राधान्य देतात. पण, तुम्ही कधी कोणत्या प्राण्याला रिक्षाच्यावर बसून प्रवास करताना पाहिलं आहे का ? नाही… तर आज सोशल मीडियावरील असाच एक व्हिडीओ (Viral Video) तुम्हाला पाहायला मिळेल.

व्हायरल व्हिडीओ बनारसचा आहे. रहदारीच्या रस्त्यावरून अनेक गाड्या ये-जा करताना दिसत आहेत. पण, या सगळ्यात एका रिक्षाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण – या रिक्षाच्या आतमध्ये नाही तर रिक्षाच्यावर एक श्वान बसलेला दिसतो आहे. श्वान न घाबरता, अगदी ऐटीत रिक्षाच्यावर बसला आहे आणि रिक्षा चालक हळहळू रिक्षा रस्त्यावरून घेऊन जाताना दिसत आहे. तुम्ही अनेकदा पाळीव प्राण्याच्या मालकासह श्वानाला रिक्षातून घेऊन जाताना पाहिलं असेल. पण, यात श्वान रिक्षावर एकटा बसला आहे. श्वानाची ऑटो रिक्षा सफर व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Vinesh Phogat Comments
Vinesh Phogat Retirement : “दबदबा होता, दबदबा आहे आणि…”, विनेश फोगटची निवृत्ती अन् चाहत्यांची हळहळ; पोस्टवर कमेंट्सचा पाऊस!
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
antim panghal sent back to india
Paris Olympic 2024: ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये बहिणीची ‘तस्करी’ करणाऱ्या अंतिम पांघालची भारतात रवानगी
Vinesh Phogat Uncle
Vinesh Phogat Retirement : “…म्हणून विनेशने निवृत्तीची घोषणा केली”, काका महावीर फोगट यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “यंदाचं सुवर्णपदक…”
pune video viral
पुण्यातील रिक्षावाल्याने केला अनोखा जुगाड, पावसाळ्यात रस्ता नीट दिसावा म्हणून…; VIDEO एकदा पाहाच
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
vijender singh on vinesh phogat disqualified
Vinesh Phogat Disqualification: “सरळ बॅगा उचला आणि…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर विजेंदर सिंग संतापला; म्हणाला, “१०० ग्रॅमसाठी…”
Vinod Kambli Health Update_
Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून नेटीझन्सची सचिन तेंडुलकरला हाक, उभंही राहता येत नसल्याचा VIDEO पाहून चाहते हळहळले

हेही वाचा…Mumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये दरवाजात उभ्या प्रवाशांची दादागिरी; स्टेशन आलं तरी उतरू दिलं नाही… शेवटी काय झालं पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

ऐटीत बसला ऑटो रिक्षाच्या छतावर :

तुम्ही चारचाकीमध्ये किंवा दुचाकीवर बसून अनेक पाळीव प्राण्यांना त्यांच्या मालकांसह प्रवास करताना पाहिलंच असेल. पण, हा व्हिडीओ अनोखा आहे. यात श्वान थेट रिक्षावर ऐटीत बसून बनारसची सफर करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @hmmmdeepak या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट करताना दिसून आले आहेत. पायी चालण्याऐवजी श्वानाने ऑटो रिक्षाची सफारी करण्याचा अनोखा मार्ग निवडला हे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आलं असेल एवढं नक्कीच…

काही दिवसांपूर्वी मुंबईचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला होता. यामध्ये सिग्नलवर एका अज्ञात व्यक्तीला कावळ्यांचा ग्रुप बसच्या छतावर दिसला होता. तेव्हा त्याने व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, हा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी मात्र मिम्स आणि कमेंटचा वर्षाव केला . कारण हा व्हिडीओ तमिळ चित्रपटातील प्रभूदेवाचं गाजलेलं गाणं ‘उर्वशी.. उर्वशी’च्या एका दृश्याची आठवण करून देत होता ; ज्यात कावळ्यांऐवजी पुरुषांचा ग्रुप डान्स करत होता. यामुळे अनेक मिम्सदेखील यावर बनवले गेले, जे सध्या प्रचंड व्हायरल झाले होते .