Viral Video Of Dog : एखादी जत्रा, मॉल किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विशेष गेम झोन असतो, जिथे अनेक प्रकारचे खेळ, राईड उपल्बध असतात. छोटे इंजिनचे डब्बे असणारी राईड, बॉलिंग, चिप्सच्या पॅकेटच्या ढिगाऱ्यात दोरीने लटकवून वस्तू उचलणे आदी अनेक खेळ इथे आपण खेळू शकतो. या गेम झोनमध्ये तुम्हाला अनेक लहान मुले दिसतील, जी पालकांकडे हट्ट करतात आणि तासनतास इथे मजा-मस्ती करत वेळ घालवतात. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी वेगळेच पाहायला मिळाले आहे. आज एका राईडवर बसण्यासाठी चक्क श्वान हट्ट करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) एका जत्रेतील आहे. येथे इंजिनचे छोटे-छोटे डब्बे असणारी एक विशेष राईड (Ghirni Ride) असते. या छोट्या-छोट्या इंजिनच्या डब्यामध्ये एकेक व्यक्ती बसू शकते आणि मग ही राईड गोल-गोल फिरू लागते. यामध्ये काही लहान मुले राईडचा आनंद घेताना दिसत आहेत. हे पाहून श्वानदेखील त्या राईडकडे अगदी आशेने बघताना दिसत आहे. तो आपल्या मालकिणीकडे त्या राईडमध्ये बसण्याची विनवणी करताना दिसतो आहे. तर मालकिणीने श्वानाचा हट्ट पुरवला का, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, श्वानाला त्या राईडमध्ये बसण्याची खूप इच्छा असते. पण, तो तितकाच घाबरतसुद्धा असतो. एकदा राईडजवळ तर एकदा मालकिणीकडे असा फेरफटका तो मारताना दिसतो आहे. हे पाहून मालकीण तिकीट खरेदी करण्यासाठी जाते, त्यांची परवानगी घेऊन तेथून तिकीट खरेदी करते आणि मग श्वानाला राईडमध्ये बसवते. इंजिनच्या छोट्या डब्यात श्वान बसतो आणि या विशेष राईडचा आनंद घेताना दिसतो. श्वानाच्या मनात काय चालू असणार याचे हिंदीमध्ये सबटायटलसुद्धा व्हिडीओवर मजकुरात लिहिले आहे, जे वाचून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.
राईड मालकाने श्वानाला बसण्याची परवानगी दिली
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pawson_dodo या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘श्वानाची उत्सुकता’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून, ‘राईड मालकाने श्वानाला बसवण्याची परवानगी दिली हे पाहून बरे वाटले’, ‘इन्स्टाग्रामवरचा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तुम्ही @pawson_dodo या अकाउंटवर पाहिलेत तर या जत्रेत श्वान डोडोने इतर अनेक राईड्सचासुद्धा आनंद घेतला आहे.