Viral Video Shows Driver Created Home For His Pets : अगदी आठवड्याभरासाठी आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर घरातील पाळीव प्राण्यांना कोण सांभाळणार असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतो. एक दिवसासाठी बाहेर जाणार असलो तर आपण शेजारच्यांकडे किंवा घरातील एका सदस्याकडे त्याची जबाबदारी सोपवून मोकळे होतो. पण, तो दिवसभर काय खाणार, त्याची नीट काळजी तर घेतली जाईल ना याची सतत चिंता आपल्या मनात असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका गाडीत चालक एका खास रीतीने त्याच्या पाळीव प्राण्यांना प्रवासाला घेऊन जातो आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) प्रवासादरम्यान शूट करण्यात आला आहे. एक अज्ञात व्यक्ती प्रवास करीत असते. त्यादरम्यान त्याला एक ट्रक दिसतो. या ट्रकचालकाने त्याच्या पाळीव प्राण्यांसाठी एक खास सोय केलेली असते. ट्रकच्या खालच्या बाजूला श्वानांसाठी दोन घरं बनवली आहेत. ट्रकच्या खालील भागात दोन बॉक्स बसवण्यात आले आहेत. एका बॉक्समध्ये दोन श्वान, तर दुसऱ्या बॉक्समध्ये एका श्वानाला ठेवलं आहे. तसेच यामध्ये श्वानांच्या गरजेच्या काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. चालकाने नक्की कशाप्रकारे श्वानांची सोय केली आहे, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Squirrel and new born baby video
‘आई कोणाचीही असो…’ नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जगवण्यासाठी खारुताईची धडपड; VIDEO पाहून येईल आईची आठवण
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Viral video of two little girls getting fighting is going viral on social Media after shankarpalya funny video
आता गं बया! बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत जोरदार राडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल मंडळी
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही

हेही वाचा…देवमाणूस! दोन्ही हातांची ओंजळ भरून श्वानाची भागवली तहान, VIRAL VIDEO पाहून कराल कौतुक

व्हिडीओ नक्की बघा…

बॉक्सला वर्तुळाकार खिडकीसुद्धा बनवली

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, ट्रकच्या खालच्या बाजूस दोन बॉक्स बनवण्यात आले आहेत. या बॉक्समध्ये ग्रीन कार्पेट, काही चित्रे चिटकवण्यात आली आहेत; तर श्वानांना प्रवास आरामदायी जावा यासाठी गादी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बॉक्सला वर्तुळाकार खिडकीसुद्धा बनवली आहे, ज्यातून श्वान डोकावून बाहेर बघत आहेत. तर एका अज्ञात प्रवाशाने हे पाहिलं आणि याचा व्हिडीओ स्वतःच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून घेतला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @just.adulting या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘चालकाने त्याच्या पाळीव प्राण्यांबरोबर प्रवास करण्यासाठी घर तयार केलं आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या चालकाचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहे. तसेच काही जण मात्र या प्राण्यांना इजा तर होणार नाही, अशी चिंता व्यक्त करताना दिसले आहेत. पण, एकूणच व्हिडीओ पाहता श्वान मात्र या प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

Story img Loader