रिपोर्टींग थांबवण्यासाठी हत्तीने केले असे काही की...; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू | Viral Video shows elephant interrupting between reporting netizens find it too cute | Loksatta

रिपोर्टींग थांबवण्यासाठी हत्तीने केले असे काही की…; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकाराला थांबावण्यासाठी हत्तीने काय केले एकदा पाहाच

Viral Video shows elephant inturupting between reporting netizens find it too cute
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हत्ती पत्रकाराला रिपोर्टींग करताना अडवत असल्याचे दिसत आहे (फोटो : सोशल मीडिया)

वेगवेगळ्या ठिकाणाहून रिपोर्टिंग करणे हे पत्रकारांसमोरचे मोठे आव्हान असते. अनेकवेळा त्यांना अनपेक्षित संकटांना सामोरे जावे लागते. कधी पावसामुळे आलेला पूर, तर कधी दहशदवादी हल्ला असा कठीण प्रसंगांमध्ये ही पत्रकारांना कर्तव्य बजावत रिपोर्टींग करावे लागते. तर कधी कधी रिपोर्टींग करत असताना असे हास्यास्पद प्रसंग घडतात, जे पाहून आपल्याला हसू अनावर होते. अशाच एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक पत्रकार हत्तींच्या कळपामध्ये उभा राहून रिपोर्टींग करत असल्याचे दिसत आहे. पण त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या हत्तींना याची कल्पना नसल्याने ते यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत. बाजुला उभा असणारा हत्ती मध्येच पत्रकाराला धक्का मारत असल्याचे दिसत आहे. त्याकडे दुर्लक्ष करत रिपोर्टींग सुरू ठेवतात, पण मध्येच मागे उभा असणारा हत्ती सोंडेने त्यांच्या चेहऱ्यावर गुदगुल्या करू लागतो. यामुळे पत्रकारालाही हसू अनावर होते आणि तेथील उपस्थित सर्वजण हसू लागतात. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : Zomato डिलीवरी बॉयने भररस्त्यातच सुरू केला डान्स; नेटकऱ्यांनी केली चिंता व्यक्त, म्हणाले ‘आम्हाला वाटले…’

व्हायरल व्हिडीओ :

व्हायरल होणाऱ्या या गोंडस व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-11-2022 at 14:48 IST
Next Story
Viral Video: बुटासाठी जीव धोक्यात घातला, रेल्वे रुळ ओलांडताना तो अडकला अन्…