Viral Video Family’s Unique Celebration For Daughter’s 12th Result : दरवर्षीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल लागले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. काही जणांचे चेहरे आनंदाने खुलले आहेत, तर काही कमी गुणांमुळे जण निराश झाले आहेत. पण, आनंद असो किंवा दुःख कुटुंबाने विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं महत्वाचं असतं. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये लेक पास झाल्यावर पेढे वाटण्याएवजी कुटुंबाने अगदी जबरदस्त सेलिब्रेश केलेलं व्हिडीओत पाहायला मिळाले आहे.
कुटुंबातील लेक १२ वीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाल्याने घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. तिच्या यशाचं खास सेलिब्रेशन करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं. बाबा, आई, बहिणी, आजोबा असा प्रत्येक सदस्याच्या हातात एक कागद होता. त्या कागदावर लेकीला मिळालेले विषयानुसार गुण अकाउंटन्स ९२, इकॉनॉमिक्स ९३, गणित ९१, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट ८५, पाली ९९ आणि इंग्रजी ७९ अशाप्रकारे मोठ्या अक्षरात लिहिलेले होते.
“कुटुंब हवं तर असंच” (Viral Video)
अनेकदा घरातील मुलं परीक्षेत पास झाले की, आजूबाजूला राहणाऱ्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला जातो. पण, व्हायरल व्हिडीओत ज्या लेकीने या परीक्षेत पास होण्यासाठी मेहनत केली. तिच्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदाने तिच्याबरोबर डान्स करत हे गुण मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर अभिमानाने दाखवत होता. घरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत होतं. एवढंच नाही तर तिच्या मेहनतीचं कौतुक म्हणून तिला प्रेमाने लाडू भरवण्यात आले. लेकीच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा @vaishuu.mundada.111 हा व्हिडीओ उमा इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “कुटुंब आपल्या मुलांच्या यशाचा आनंद अशा प्रकारे साजरा करतं”, “हे खूपच गोड आहे. घरातील प्रत्येक जण मनापासून आनंद साजरा करताना दिसत आहे. आयुष्यात पुढचं मोठं यश मिळवण्याच्या धावपळीत आपण अशा छोट्या आनंदाच्या क्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. आपल्या माणसांबरोबर आनंद साजरा करणं खूप महत्त्वाचं असतं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
