Viral Video Shows Family Heartwarming Farewell To Their Maid : घरकाम करणाऱ्या महिला, तरुणींचे स्थान घरात खूप महत्त्वाचे असते. अगदी स्वतःच्या घरासारखे दुसऱ्यांचे घर सांभाळणे वाटते तितके सोपे नसते. भांडी घासणे, लादी पुसणे, कपडे धुणे, घर स्वच्छ ठेवणे ते घरातील लहान बाळांना आईसारखी माया करणे हे फक्त त्यांनाच जमते. घरकाम इतर सर्व कामांप्रमाणेच एक प्रकारचे काम आहे. पण, यामध्ये गोडवा, आपुलकी व जिव्हाळा आहे. तर आज सोशल मीडियावर अशाच एका घरकाम करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
एका कुटुंबात अनेक वर्षांपासून घरकाम करणाऱ्या एका तरुणीचे लग्न ठरलेले असते. लग्न ठरल्यामुळे अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कुटुंबाला ती सोडून जाणार असते. त्यामुळे ती काम करते, त्या कुटुंबाने तिला खास निरोप देण्याचे ठरवले. त्यांनी सगळ्यात आधी तिला सोफ्यावर बसवून तिचे औक्षण केले. त्यानंतर तिला एकेक करून भरपूर भेटवस्तूसुद्धा दिल्या. कुटुंबाने दाखविलेले प्रेम व दिलेला सन्मान पाहून तरुणी भावूक झाली आणि त्या तरुणीच्या डोळ्यांत पाणी आलेले पाहून घरमालकिणीने तिला जवळ घेतले.
लेकीप्रमाणे दिला निरोप (Viral Video)
एवढेच नाही जसा व्हिडीओ पुढे जातो तसे घरमालकीण तरुणीच्या हातात तिचे बाळ देते. बाळ लगेच तरुणीला मिठी मारते; ज्याच्या जन्मापासून तरुणीने सांभाळ केलेला असतो. पण, तितक्यात मागून कोणीतरी म्हणतं “आता दीदी लग्न करून जाणार” हे ऐकताच बाळ “नाही” म्हणून जोरजोरात रडू लागते. हे पाहून तरुणी “नाही जाणार मी, रडू नकोस तू”, असे म्हणत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा रडायला लागते. हा क्षण पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढे तर नक्की.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ragu_ie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘हृदयस्पर्शी निरोप : वर्षानुवर्षे सेवा केल्यानंतर लग्न करणाऱ्या प्रिय मोलकरणीला कुटुंबाने भावनिक निरोप दिला’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत. कुटुंबातील लाडकी लेक जेव्हा घर सोडून जाते. तेव्हा ज्या प्रकारे तिला निरोप दिला जातो, अगदी त्याचप्रमाणे या मोलकरणीला निरोप देताना दिसत आहेत…