video Farmer Upset Over Low Price for Coriander Bunch : मार्केटमध्ये भाजी घेताना हिरवीगार कोथिंबीर दिसली की आपण सगळेच पटकन विकत घेतो. पण, भाजी विक्रेते एक- दोन कोथिंबीरच्या जुडीचे जास्त भाव लावतात. मग थोडं आपण लाडीगोडी लावून आपण पैसे कमी करून घेतो किंवा अगदी खूप भाज्या घेतल्यावर कोथिंबीर थोडी का होईना फुकटच मागतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये शेतकऱ्याचे कोथिंबीर विकताना हाल पाहून तुम्ही कधीच कोथिंबीर कमी पैशात घेण्याचा हट्ट करणार नाही.
शेतकरी कष्टाने पिकवलेली कोथिंबीर विकताना दिसतो आहे. पण, त्याने मेहनतीने पिकवलेल्या कोथिंबीरच्या जुडी पाहिजे तशा भावात विकली जात नव्हती. यादरम्यान एका माणसाने शेतकऱ्याची व्यस्था व्हिडीओद्वारे सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचे ठरवले. शेतकरी व्हिडीओत सांगतोय की, निदान या सगळ्या कोथिंबीरच्या सगळ्या जुडीचे १०० रुपये तरी द्या; जेणेकरून गाडीचे भाडं भरू शकेन. पण, तेही कोणी द्यायला मागत नाही आहे; जे पाहून तुमचेही डोळे पाणवतील.
भाजी नाही त्याच कष्ट विकतोय (Viral Video)
शेती, शेतकरी यांच्या समृद्धीवरच देशाचा विकास अवलंबून असतो. पण, शेतकऱ्याचं घरसुद्धा याच शेतीवर चालत असते. अनेकदा मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तरीही घरखर्च आणि मुलांच्या पोटा-पाण्यासाठी त्याला कमी किंमतीतही माल हा विकावा लागतो.व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, वर्षभर कष्ट करून त्याला फक्त २०० रुपयांसाठी रडावे लागते आहे. शेतकरी राजा काय म्हणतोय एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shetimitra_sunil_dhatrak या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “डोळ्यांत पाणी आले राव”, “ही व्हिडीओ बघितल्यावर मला समजलं एक शेतकरी आपली मुलगी शेतकऱ्याला का देत नाही; कटू आहे पण सत्य आहे”, “१० च्या २ जुड्या द्या म्हणणाऱ्यांनो बघा शेतकऱ्याची व्यथा…”, “शेतकरी भाजी नाही त्याच कष्ट विकतोय हे लक्षात ठेवून मोलभाव करा”, “आमच्या इथे एक जुडी कोथिंबीर ४० रुपयेला येते त्यात पण एवढी मोठी नसते. याचा अर्थ शेतकऱ्याकडून कमी भावात घेऊन इतरांना जास्त भावात विकतात; त्यात जास्त मेहनत शेतकरी भावाची आहे; हा सायकल सुधारला पाहिजे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
