Viral Video Of Father And Son : बाबांचे आपल्या लेकावर लेकीएवढे प्रेम नसले तरीही त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण होतायंत ना याकडे बाबांचे पूर्णपणे लक्ष असते. पण, बाबांना मिठी मारायला, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढायला, त्यांच्याशी हात मिळवायला आजही अनेक मुले घाबरतात. पण, आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. कारण – लेकाने आपल्या बाबांबरोबर चक्क डान्स केला आहे.

‘ट्यूबलाईट’ चित्रपटातील ‘नाच मेरी जान’ हे गाणे तुम्ही आजवर अनेकदा ऐकले असेल. तर आज संगीत कार्यक्रमादरम्यानया गाण्यावर बाबा आणि लेकाने जबरदस्त डान्स केला आहे. “तू मेरा हुकुम का इक्का, तू ही मेरा किरकिट का छक्का, मैं अलादीन, तू मेरा जिन, मैं अधुरा, तेरे बिन…” अशी गाण्याची ओळ म्हणून तो बाबांकडे हात दाखवतो आणि त्यांच्याबरोबर डान्स करण्यास सुरुवात करतो. बाबा आणि लेकाचा ताळमेळ, त्यांचे हावभाव, दोघांमधील केमिस्ट्री, त्यांच्या स्टेप्स तुम्हालाही प्रेमात पडायला भाग पडतील एवढे तर नक्की…

तुमच्यात खूप प्रेम आहे (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, बाबा आणि लेक ‘नाच मेरी जान’ या गाण्यावर काळ्या रंगाचा कोट घालून डान्स करताना दिसत आहेत. डान्सच्या निमित्ताने लेकाने बाबांना मिठी मारली, त्यांच्याशी हात मिळवला, त्यांच्यावर असणारे प्रेम गाण्यांमार्फत त्यांच्यासमोर मांडले आणि असा त्यांचा डान्स आणखीन आकर्षित झाला. ऑन-स्क्रीन गाणे सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खानचे होते. पण, बाबा-लेकाच्या या ऑफ-स्क्रीन जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. एकदा बघाच बाबा आणि लेकाचा हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by Nitesh & Muskan (@pyaarkanuska)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pyaarkanuska या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अशाप्रकारे बाबांबरोबर डान्स करण्याचे प्रत्येक लेकाचे स्वप्न असते. त्यामुळे नेटकरी सुद्धा डान्स पाहून भारावून गेले आहेत आणि वेगवेगळ्या शब्दांत या व्हिडीओचे कौतुक करून प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत आणि “तुमच्यात खूप प्रेम आहे” ; अशी कमेंट्स सुद्धा नेटकऱ्यांनी केली आहे.