Viral Video Shows Fight Between passengers On Flight : लाइटहाऊस जर्नलिझमला विमान प्रवासात प्रवासी भांडत आहेत, असा एक व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ (Video Viral) मुंबईचा आहे, असा दावा अनेक पोस्ट्समधून करण्यात आला होता आणि काही युजर्सनी हा व्हिडीओ जातीय दाव्यासह शेअर केला होता. नक्की काय घडलं होतं या विमान प्रवासात? या व्हिडीओचं सत्य काय ते बातमीतून सविस्तर जाणून घेऊ या…

काय होत आहे व्हायरल (video viral)?

एक्स (ट्विटर) युजर @maheshyagyasain याने हा व्हिडीओ भ्रामक दाव्यासह शेअर केला आहे. या व्हिडीओला, ‘विमानातील मारामारीचे दृश्य… त्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या सर्वांना अटक करण्यात आली… ही घटना मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाण करणारे सर्व मुस्लीम समाजातील होते. एकमेकांना ओळखत नसले तरी एकत्र येतात, त्यांची एकजूट पाहा, डुबून मरा हिंदूंनो’, अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
bangladesh boy recording TikTok video with friends hit by train survives Video Viral
“सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही

इतर युजर्सदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह हा व्हिडीओ (Video Viral) शेअर करीत आहेत.

हेही वाचा…‘अजून एक लाडू बावासाठी… ‘ तुम्ही कधी पंगतीत जेवायला बसला आहात का? मग पाहा गावकडचा ‘हा’ VIRAL VIDEO

तपास :

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून, आमचा तपास सुरू केला आणि त्यानंतर त्यातून मिळालेल्या कीवर्डवर शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान आम्हाला २८ डिसेंबर २०२२ ची एक एक्स (ट्विटर) पोस्ट सापडली.

THAI Smile फ्लाइटमध्ये भारतीय प्रवासी भांडत असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. THAI Smile ही थाई एअरलाइन्स कमी किमतीची उपकंपनी होती आणि २०२३ मध्ये ती कंपनी बंद झाली आहे.

https://www.airwaysmag.com/legacy-posts/the-end-of-thai-smile-airways#:~:text=Thai%20Airways’%20low%2Dcost%20subsidiary,years%20of%20the%20airline’s% ????20 जीवन.???

आम्हाला या घटनेबाबत बातम्याही मिळाल्या.

Fight Breaks Out On Bangkok-Kolkata Flight After Passenger Refuses To Sit Upright, Airline Apologises

https://www.onbnews.today/post/87205

वृत्तानुसार, बँकॉकहून कोलकाता येथे जाणाऱ्या ‘थाई स्माईल एअरलाइन्स’च्या फ्लाइटमध्ये ही घटना घडली होती. एएनआयच्या वृत्तानुसार, भारतीय नागरी उड्डाण अधिकारी विमान कंपन्यांना शिफारस करण्याचा विचार करत होते की, त्यांनी भांडणात सहभागी असलेल्या प्रवाशांना नो-फ्लाय लिस्टमध्ये ठेवावे.

निष्कर्ष : थाई स्माईल एअरलाइन्स’ मधील भारतीय प्रवाशांच्या भांडणाचा जुना व्हिडीओ आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला जात आहे. पण, ही घटना अलीकडची नाही. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे, असे आमच्या तपासातून स्पष्ट होत आहे.

Story img Loader