scorecardresearch

VIRAL VIDEO : चालत्या मेट्रोमध्ये तरुणीचा गजब डान्स तुफान व्हायरल! युजर्स म्हणाले…

हा व्हिडीओ आतापर्यंत ३ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

VIRAL VIDEO : चालत्या मेट्रोमध्ये तरुणीचा गजब डान्स तुफान व्हायरल! युजर्स म्हणाले…
(Photo: Instagram/ thinlay.bhutia)

Dance In Metro Video Viral : सोशल मीडियाच्या या युगात सर्वांनाच लोकप्रिय व्हायचे आहे आणि यामुळेच युजर्स इन्स्टाग्राम रील आणि फेसबुकच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करतात. आता एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी चालत्या मेट्रोमध्ये नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ३ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट केल्या आहेत. याहूनही मजेदार गोष्ट म्हणजे नाचताना दिसणारी ही मुलगी आणि तिच्या मैत्रिणीची रेकॉर्डिंग करणारी मुलगी यांच्या आजूबाजूला दिसणारे बरेच लोक आपल्याच धुंदीत असलेले दिसत आहेत. काही लोक मुलीची स्तुती करत आहेत तर काही लोक त्याचा आनंदही घेत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, मेट्रोच्या सीटवर मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले आहेत. तिथे काही लोक उभे आहेत. मेट्रोमध्ये बसलेले सगळेच प्रवासी आपल्याच धुंदीत असताना अचानक खांबाला धरून एका पांढऱ्या ड्रेसमध्ये असलेली मुलगी नाचू लागते. तर तिच्या समोर उभं राहून तिची एक मैत्रीण तिचा डान्स आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करू लागते. कॅमेऱ्यात डान्स रेकॉर्डिंग करणारी मुलगी “एक, दोन, तीन, गो!” असं म्हणताच समोर उभी असलेली मुलगी डान्स करू लागते. आजुबाजूला असलेले सर्व प्रवासी दोन्ही मुलींकडे एकटक पाहत आहेत. काही प्रवासी तर ही रोजचीच गोष्ट असल्यासारखं वाटून आपल्या धुंदीत बसलेले दिसत आहेत. मात्र, तरीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय.

आणखी वाचा : VIRAL : पती, पत्नी और वो! एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात होता नवरा, मग बायकोने दोघांचं लग्न लावलं आणि आता…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधला आहे. या व्हिडीओ thinlay.bhutia नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ‘कॉन्फिडन्स असावा तर असा’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. मेट्रोमध्ये इतक्या लोकांसमोर नाचण्याचं मुलीचं हे धाडस पाहून लोक थक्क झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर असे आहे,” तसंच दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘मेट्रोमध्ये इतक्या सर्व लोकांसमोर डान्स करण्यासाठी मोठं धाडस लागतं.’

आणखी वाचा : Facts About Indian Railway: भारतीय रेल्वेशी संबंधित ‘या’ गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : सेम टू सेम लहान बाळासारखा रडतो हा पक्षी, VIRAL VIDEO पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही!

लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आवर्जून तो पुढे आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या