VIRAL VIDEO : कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने मुलांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी-आजोबांबरोबर असतात. गावी जाताना खाऊसाठी हातावर पैसे टेकवण्यापासून ते अगदी आवडीचे जेवण बनवण्यापर्यंत आजी नातवंडांसाठी प्रत्येक गोष्ट आनंदाने करताना दिसते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये थरथरत्या हाताने नातवंडांसाठी जेवण करताना दिसते आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video ) स्वयंपाकघरातील आहे. इन्स्टाग्राम युजर स्नेहलने तिच्या आजीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. नातीने तिच्या आजीला तिची आवडीची भाजी करायला सांगितले असते. मग काय, आजी नऊवारी साडी नेसून, पायात स्लीपर घालून स्वयंपाकघरात उभी राहते आणि तिच्या सुरकुतलेल्या हातांनी तिच्या नातीसाठी भाजी बनवण्यास सुरुवात करते. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या आजीची आठवण येईल एवढं नक्की. नक्की पाहा हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
आशीर्वाद देणारी माऊली…
व्हायरल व्हिडीओत (viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, आजी अगदी मनापासून नातीसाठी भाजी बनवते आहे, हे पाहून नातं तिचा व्हिडीओ शूट करते आणि सोशल मीडियावर शेअर करत लिहिते की, “वय वर्ष २८ तरीसुद्धा आपल्या नातवंडांना स्वतःहून बनवून त्यांच्या आवडीची भाजी खाऊ घालते ती आजी. कारण तिच्या सुरकुतलेल्या हाताने बनवलेल्या भाजीची चव शोधूनही कुठे भेटणार नाही” ; अशा भावना नातीने अजीबद्दल मांडल्या आहेत, जे वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @snehalraghorte या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “मायेचा ओलावा…. प्रेमाची सावली आजी म्हणजे काय तर आशीर्वाद देणारी माऊली हाय..!!” ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत आणि प्रत्येकजण आपल्या आजीची आठवण सांगताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. अशाप्रकारे सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.