Viral Video : आजी-आजोबा म्हणजे थकले-भागलेले, तब्येतीच्या तक्रारी सांगणारे हे दृश्य आता कमी होऊ लागले आहे. कारण- नातवंडांची जबाबदारी आजी-आजोबा आनंदाने स्वत:कडे घेताना दिसतात. आई-बाबा घरात नसले की, दिवसभर ही नातवंडे आजी-आजोबांकडे असतात. पण, हेच आजी-आजोबा आपल्यापासून दूर गेले की, मग त्यांची प्रत्येक गोष्ट आठवण म्हणून आपल्या मनाच्या पेटीत अमूल्य ठेवा साठून राहते. मग कधीतरी तो उमाळा अश्रूंद्वारे बाहेर पडतो. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये देवाघरी गेलेल्या आजीला नात तिच्या वडिलांच्या आत्यामध्ये शोधताना दिसते आहे.
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) एक आजी व नात दिसते आहे. नात तिच्या ज्वेलरी बॉक्समधून काही वस्तू काढून आजीला घालताना दिसते आहे. पहिली अंगठी, मग झुमके अशी एकेक वस्तू ती आजीला घालताना दिसते आहे. नातीचे हे प्रेम पाहून आणि या फॅशनेबल वस्तू घालून आजीच्या चेहऱ्यावर फुललेला आनंददेखील बघण्यासारखा आहे. आजीला खूश झाल्याचे पाहून नात तिचे प्रेमाने गाल ओढते आणि या व्हिडीओचा शेवट होतो. पण, हा व्हिडीओ शेअर करीत नातीने काय कॅप्शन लिहिली आहे ते तुम्हीसुद्धा नक्की बघा…
हेही वाचा…‘अजून एक लाडू बावासाठी… ‘ तुम्ही कधी पंगतीत जेवायला बसला आहात का? मग पाहा गावकडचा ‘हा’ VIRAL VIDEO
व्हिडीओ नक्की बघा…
ती खूप खुश झाली…
तर व्हायरल व्हिडीओच्या (Viral Video) कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, माझ्या आजीचे निधन होण्यापूर्वी मी तिच्याबरोबर जास्त वेळ न घालवल्याबद्दल मला खेद वाटतो आहे. व्हिडीओत माझी बुवा अम्माजी (म्हणजे माझ्या वडिलांची आत्या) आहे. जरी मी तिला वर्षातून फक्त एकदाच भेटत असले तरीही माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि ती माझ्या आजीच्या सगळ्यात जवळची व्यक्ती आहे. कारण- ती तिच्या पिढीतील सगळ्यात शेवटची आहे. त्यामुळे तिला तिच्या पिढीतील प्रत्येकाची खूप आठवण येते आहे. तिचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मी माझे दागिने दाखवले. ओह माय गॉड (OH MY GOD) ती खूप खूश झाली, अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kshipravats_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो पाहून तुम्हालाही तुमच्या आजीची आठवण येईल आणि डोळ्यांत चटकन पाणी येईल.