grandmother Grocery Shop viral video : जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक म्हणजे बनारस. हे शहर फिरण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातुन लोकं येत असतात. येथील घाट, गंगा आरती, स्थानिक पदार्थांची चव घेणे अनेक पर्यटक पसंत करतात. तर आज बनारसमधील आणखीन एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट व्हायरल होत्ते आहे. राम घाटाजवळ, सुत टोला नावाच्या एका अरुंद गल्लीत असणारे छोटेसे दुकान सगळ्यांच्याच पसंतीस उतरते आहे. इथे मालकाबरोबरच त्या दुकानाची हटके स्टाईल सुद्धा प्रसिद्ध आहे,
बनारसमध्ये वृद्ध महिला जे दुकान चालवते ते तळ मजल्यावर नसून पहिल्या मजल्यावर आहे. इथे कोणतेही फॅन्स वस्तू मिळत नाहीत. तर रोजच्या वापरातील किराणा सामान तुम्हाला अगदी सहज मिळते. या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या पद्धतीने त्याला चालवले जाते. ग्राहक सहसा रस्त्यावरूनच हाक मारतात आणि ती महिला खिडकीतून वस्तू खाली आणून देते. हे बनारस आहे; जिथे अगदी पहिल्या मजल्यावरचं छोटंसं दुकानसुद्धा स्वतःची वेगळी ओळख ठेवून असतं. इथं प्रत्येक गोष्ट खास आहे, साधी असली तरी तिचं महत्त्व वेगळंच जाणवतं.
तुम्ही व्हिडीओत पाहिले असेल की, ग्राहक पार्लेजी बिस्कीट घ्यायला आलेला असतो. मग तो बिल्डिंगकडेला लागून असणाऱ्या रस्त्यावर उभा राहून हाक देतो. त्यानंतर मग आजी एका लाल रंगाच्या बादलीतून सामान दोरीद्वारे ग्राहकापर्यंत पोहचवते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ या @varanasi360 आणि @nomadicframesbypp इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बनारसमधील अनोखं दुकान व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडीओ पाहून काही युजर्सनी त्यांनी भेट दिलेल्या बनारसच्या आठवणी सांगितल्या आहेत. “मणिकर्णिका घाटाजवळ, बाबा विश्वनाथांच्या भिंतीजवळ, असेच आणखी एक दुकान आहे. तळमजल्यावर तुम्ही पैंजण आणि इतर दागिने यांसारख्या वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही आवाज दिल्यास, वरची महिला प्रतिसाद देते आणि तुम्हाला हवी असलेली वस्तू घेण्यास सांगते”, “वृद्ध महिलेने आधी पैसे घेतले पाहिजेत” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
