Viral Video Shows Grandparents Got Married Again : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. त्यामुळे आपलं लग्न खास व्हावं यासाठी प्रत्येक जण काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात दिसतो. तसेच लग्नानंतर, लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यावर, सहा महिने पूर्ण झाल्यावर किंवा एक वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा खास सेलिब्रेशन करण्यात येते.पण , आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आजी-आजोबांचे पुन्हा एकदा कुटुंबातील सदस्यांनी लग्न लावून दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओची (Viral Video) सुरुवात आजोबा आणि आजीच्या एन्ट्रीने होते. कुटुंबातील सदस्य आजी व आजोबांना छान तयार करून घेऊन येत असतात. कारण आज आजी-आजोबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि याचनिमित्त त्यांचं पुन्हा एकदा लग्न लावून देण्याचा थाट घरच्यांनी घातलेला असतो. आजीने निळ्या रंगाची साडी, तर आजोबांनी ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता परिधान केलेला असतो. त्यातच खास गोष्ट म्हणजे दोघांनीही मोगऱ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधलेल्या असतात. आजी-आजोबांचा लग्नाचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा करण्यात आला व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा…हेमंत सोरेन यांनी मोफत कफन वाटपाची केली घोषणा? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा

व्हिडीओ नक्की बघा…

लग्नाचा ६० वा वाढदिवस

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, आजी-आजोबांचा लग्नाचा ६० वा वाढदिवस असतो. याचनिमित्त आजी-आजोबांना पारंपरिक वेशभूषा करून, गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून अंतरपाटासमोर उभं करण्यात आलेले असते. त्यानंतर मंगलाष्टका, अक्षता टाकून मग आजी-आजोबांनी एकमेकांना फुलांचा हार देखील घातला आहे. अशाप्रकारे कुटूंबातील सदस्यांनी उत्साहात त्यांचे लग्न लावून दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून शेवटपर्यंत साथ देणारा असा एक जोडीदार तुमच्याही आयुष्यात असावा असं तुम्हाला नक्कीच वाटेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सुरवातीला @aayuuuu02 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता, जो @classicweddingvibes अकाउंटवरून पुन्हा एकदा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘एक नातं आयुष्यभराच’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. अनेक युजर्सना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या आजी-आजोबांची आठवण आली आहे. तसेच काही जण या व्हिडीओचे विविध शब्दात कौतुक करताना दिसून आले आहेत. तर अनेक जणांनी अशाप्रकारे त्यांच्या आजी-आजोबांचे लग्न लावलं आहे असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.

Story img Loader