Viral Video : नातवाचे पहिले मित्र म्हणजे आजी- आजोबाच असतात. कारण जन्मल्यावर आजी-आजोबा पहिल्यांदा नातवाला हातात घेतात. नात्याची खरी जडण-घडण तिथूनच सुरू होते. वाढदिवसाला नातवाच्या हातावर पैसे ठेवणे ते त्याचा आवडता पदार्थ खायला बनवणे आदी अनेक गोड आठवणी नातवंड व आजी-आजोबांच्या असतात. तर असाच एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये बाळ नुकतंच जन्माला आलेलं असतं. हे पाहून आजी-आजोबा जे करतात ते पाहून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) हॉस्पिटलमधील आहे. बाळ नुकतंच जन्माला आलेलं असतं. यादरम्यान एक अज्ञात व्यक्ती व्हिडीओ काढत असते. डॉक्टर बाळ हातात घेऊन कुटुंबातील सदस्यांकडे येते. कुटुंबातील सदस्य बाळाला पाहण्यासाठी धाव घेतात, काही जण फोटो काढू लागतात. मात्र, आजी-आजोबा आपल्या नातवाला पाहून खूश होतात आणि डॉक्टरच्या पाया पडतात. त्यानंतर आणखीन एक अशी गोष्ट करतात, जे पाहून तुमचेही डोळे नक्कीच पाणावतील. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओत तुम्हीसुद्धा बघा.

Puneri patya viral puneri pati outside hospital funny puneri poster goes viral
PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Ward Boy Performs ECG Jodhpur :
Jodhpur : धक्कादायक! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केला रुग्णाचा ‘ईसीजी’; व्हिडीओ व्हायरल, कुठे घडली घटना?
Elderly Couple Dancing At Mohit Chauhan's Concert
VIRAL VIDEO : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हातात हात धरून नाचणारे आजी-आजोबा, रोमँटिक डान्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Indian jugad To Stop Footwear Theft In The Temple Use This Unique Trick Desi Jugaad Video
VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…

हेही वाचा…बापरे! चहा विक्रेत्याची एका महिन्याची कमाई ऐकली तर नोकरी सोडून द्याल; VIRAL VIDEO बघून बसेल धक्का

व्हिडीओ नक्की बघा…

जुन्या पिढीने आनंदाचे क्षण डोळ्यांत टिपले…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर बाळ घेऊन येत असते. तितक्यात आजी-आजोबा समोरून येतात आणि डॉक्टरच्या पाया पडतात. त्यानंतर आजोबा त्यांच्या छोट्याश्या पिशवीतून ५०० रुपयांची नोट काढतात आणि डॉक्टरला देतात. डॉक्टर सुरुवातीला पैसे घेण्यास नकार देते. मात्र आजोबांच्या आग्रहाखातर ती नंतर पैसे घेते. हे फक्त गावाकडची लोकच करू शकतात, असा मजकूरही व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आजी-आजोबांचा साधेभोळेपणा तुमचेही मन नक्कीच जिंकेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बाळाची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरला आजी-आजोबांनी दिलेल्या ५०० रुपयांची किंमत लाखमोलाची आहे’; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘हीच तर संस्कृती हवी’, तर दुसरा म्हणतोय की, ‘आजपर्यंत बघितलेला सर्वात छान व्हिडीओ’, तर तिसरा म्हणतोय की, ‘जुन्या पिढीने आनंदाचे क्षण डोळ्यांत टिपले, तर नवीन पिढीने आनंदाचे क्षण मोबाइलमध्ये’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.