Viral Video Shows Groom Dancing With His Pet Dog : सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. अनेक जण आपल्या लग्नसोहळ्याची तयारी करत आहेत. आपलं लग्न खास व्हावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. लग्नाला मंडपात येताना नवरा नवरीकडे वरात घेऊन येतो. ही वरात अनेकदा बैलगाडी, आलिशान गाड्या किंवा घोडागाडी किंवा फक्त घोड्यावरून काढली जाते आणि वरातीत कुटुंबातील सदस्य अगदी आनंदाने नाचत असतात, असे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये नवरदेव चक्क श्वानाला घेऊन नाचताना दिसला आहे.

व्हायरल व्हिडीओ वरातीचा आहे. वरात नाचत-गाजत नेण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि नवऱ्याचे मित्र आणि मैत्रिणी सज्ज झाल्या आहेत. पण, अशातच नवऱ्याने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवरा घोडागाडीवर उभा आहे आणि त्याच्या पाळीव श्वानाला उचलून घेऊन नाचताना दिसत आहे. एवढेच नाही, तर श्वानासाठी खास गुलाबी रंगाचे कपडे शिवून घेतले आहेत. कशा प्रकारे नवरा आपल्या श्वानाबरोबर डान्स करताना दिसत आहे ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा (Viral Video) नक्की बघा…

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
little boy danced to the song aaj ki raat at restaurant the video is currently going- viral on social Media
“आज की रात मजा हुस्न का लिजीये” गाण्यावर हॉटेलमध्ये चिमुकल्याचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून थक्क व्हाल असा डान्स
Beautiful dance performance by barkat arora
‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO
Dad and daughter dance
“गोरी गौरी मांडवाखाली…”, हळदीमध्ये बाप-लेकीचा धिंगाना! अफलातून डान्स Video होतोय Viramu
Bride dance video in her wedding on kalubaich var majhya bharal angat song video
काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात…म्हणत नवरीने स्वत:चंच लग्न गाजवलं; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल

हेही वाचा…काय चूक होती त्याची? ‘कांतारा‘ सिनेमा पाहून जोरात ओरडला अन् आईने धोपटला; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून

व्हिडीओ नक्की बघा…

वरातीत श्वानाला घेऊन केला डान्स

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, लग्न हा खास दिवस असतो. त्यामुळे या दिवशी आपल्या जवळची खास माणसे आपल्याबरोबर असली की, दिवस आणखीन अविस्मरणीय होऊन जातो. अलीकडच्या काळात श्वान पाळणे वाढत चालले आहे. पाळीव प्राणी फक्त प्राणी नसून, त्यांच्या कुटुंबातील आणि आयुष्यातील खास सदस्य आहे हे दाखवीत नवऱ्याने आपल्या आनंदाच्या क्षणी म्हणजेच वरातीत आपल्या श्वानाला घेऊन डान्स केला. ते पाहून वरातीत नाचणाऱ्यांची त्याने मने जिंकून घेतली आणि सोशल मीडियावरसुद्धा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @awesome_guwahati_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. श्वानप्रेमी हा व्हिडीओ पाहून खूप खूश झाले आहेत आणि नवऱ्याच्या या खास कृत्याचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत. आयुष्यातील खास क्षणांमध्ये पाळीव प्राण्यांचा समावेश करण्याच्या वाढत्या ट्रेंडचा हा व्हिडीओ म्हणजे पुरावा आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Story img Loader